SAFF U19 Women : भारत विजयी झाल्याने बांगलादेशी संघ आणि दर्शक यांच्याकडून गोंधळ अन् हिंसा !
|
ढाका (बांगलादेश) – ‘दक्षिण आशिया फुटबॉल फेडरेशन’च्या १९ वर्षांखालील महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद संयुक्तपणे भारत आणि बांगलादेश यांना देण्यात आले. दोन्ही संघांनी १-१ असे गोल केले होते. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूटआऊटमध्येही दोन्ही संघांची बरोबरीच राखली. शेवटी विजेता घोषित करण्यासाठी नाणेफेक करण्यात आले. हे भारताने जिंकल्याने भारताला विजेता घोषित करण्यात आले. यास बांगलादेशाच्या महिला खेळाडूंनी प्रचंड विरोध केला. तसेच ‘स्टेडियम’मधील दर्शकांनीही गोंधळ घालण्यास आरंभ केला. मोठा जमाव मैदानात बाटल्या फेकतांना दिसला, तर काहींनी दगडफेकही केली. सर्वत्र गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे उभय देशांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले.
South Asian Football Federation's Under-19 Women's football championship !
India's victory leads to chaos and violence from the Bangladeshi team and spectators !
Both countries declared joint winners !
This shows the fanatical mentality of the people and players of India's… pic.twitter.com/VKbzXmXPva
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 9, 2024
ही स्पर्धा बांगलादेशात खेळली गेली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून सामना अधिकार्यांना त्यांचा निर्णय पालटावा लागला. त्यांनी नाणेफेकीचा निर्णय रहित करून भारत आणि बांगलादेशला संयुक्त विजेते घोषित केले.
संपादकीय भूमिकाभारताचा ‘मित्रदेश’ बांगलादेशातील जनता आणि खेळाडू यांची धर्मांध मानसिकता यातून दिसून येते. अशांना अद्दल घडवण्यासाठी भारत सरकारने पावले उचलावीत ! |