प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या येथे एकूण १ कोटी लोकांची भेट !
मौनी अमावास्या
प्रयागराज (उत्तरप्रदेश) – ९ फेब्रुवारी या दिवशी झालेल्या मौनी अमावास्येला प्रयागराज, वाराणसी आणि अयोध्या येथे एकूण १ कोटीहून अधिक भाविक एकत्र आले. प्रयागराजमध्ये चालू असलेल्या माघ मेळ्यात भाविकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले. गंगास्नानासाठी वाराणसीच्या सर्व घाटांवर मिळून लाखो भाविक आले होते. श्री रामललाच्या अयोध्येतही सकाळपासूनच शरयू घाटावर प्रचंड गर्दी होती. हनुमानगढीबाहेर एवढी गर्दी होती की, त्यावर नियंत्रण ठेवणे पोलिसांना अवघड झाले. या वेळी मंदिराच्या बाहेर २ किलोमीटरपेक्षा अधिक लांब रांग होती.
सौजन्य जनसत्ता
प्रयागराजचे पोलीस आयुक्त रमित शर्मा यांनी सांगितले की, ड्रोनद्वारे पाळत ठेवली जात आहे. माघ मेळ्याच्या परिसरात होणारी गर्दी पहाता वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.