बरेली (उत्तरप्रदेश) येथे मौलाना तौकीर रझा याने मुसलमानांवरील कारवाईंचा निषेध म्हणून अटक करवून घेतली !

समर्थकांकडून सरकारविरोधी घोषणा

बरेली (उत्तरप्रदेश) – इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिलचा प्रमुख मौलाना तौकीर रझा खान याने ९ फेब्रुवारीला दुपारी येथील पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःला अटक करवून घेत मुसलमानांवर होणार्‍या कारवाईंच्या विरोधात निषेध व्यक्त केला. त्याला नंतर सोडण्यात आले. या वेळी संपूर्ण शहरात, तसेच रझा यांच्या घराबाहेर सकाळपासून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. उत्तरप्रदेशात बेकायदेशीर मशिदी, मदरसे आणि मुसलमानांच्या इमारती यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ त्यांनी स्वतःहून अटक करून घेतली.

सौजन्य झी न्यूज 

कडेकोट बंदोबस्तात मौलाना रझा याने इस्लामिया मैदानाजवळील अल् हजरत मशिदीत जाऊन नमाजपठण केले. ही माहिती मिळताच त्याच्या समर्थकांची गर्दी झाली होती. त्यांनी येथे रस्त्यावर बसून गोंधळ घातला. जमावाने सरकारविरोधी घोषणा दिल्या. नंतर मौलानाच्या आवाहनानंतर सर्व समर्थक तेथून निघून गेले. सध्याची परिस्थिती पहाता संपूर्ण परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

(म्हणे) ‘मुसलमानांची घरे, मदरसा, मशीद यांवरील बुलडोझर सहन होणार नाही !’ – मौलाना रझा

बेकायदेशीरित्या बांधण्यात आलेल्या प्रत्येक वास्तूवर बुलडोझर चालणारच आहे. जे याला विरोध करतील त्यांना कारागृहात डांबले पाहिजे, असेच प्रत्येक सरकारने धोरण अवलंबणे आवश्यक !

मौलाना रझा

नमाजपठणाला जाण्यापूर्वी मौलाना तौकीर रझा याने म्हटले की, आमच्यावर बळजोरी केली जात आहे. देशात द्वेषाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुणी गुन्हा केला असेल, तर त्याला अटक झाली पाहिजे. मुसलमानांची घरे, मदरसे, मशिदी यांनी कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यांच्यावर बुलडोझर का चालवले जात आहेत ? याला आमचा विरोध राहील. आता बुलडोझर खपवून घेतला जाणार नाही.

संपादकीय भूमिका 

हिंदुविरोधी आणि देशविरोधी विधाने करणार्‍या मौलाना (इस्लामचा अभ्यासक) तौफीर रझा याला पोलिसांनी स्वतःहून अटक करून कारागृहात डांबणे आवश्यक आहे. उत्तरप्रदेशमध्ये भाजपच्या सरकारकडून हिंदूंना हीच अपेक्षा आहे !