कोळसा घोटाळ्यात कुणाचे हात काळे झाले ? – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन्
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन् यांचा काँग्रेसवर घणाघात !
नवी देहली – ८ फेब्रुवारी या दिवशी लोकसभेत अर्थव्यवस्थेविषयी श्वतेपत्रिका (महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात सादर केलेली माहिती) सादर करण्यात आली होती. ९ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन् यांनी संसदेला संबोधित केले. त्या म्हणाल्या की, भारतीय अर्थव्यवस्थेने आता पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (‘यूपीए’च्या) सत्ताकाळात अर्थव्यवस्थेचा स्तर उंचावण्यासाठी विशेष काही घडले नाही. त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था अत्यंत नाजूक अवस्थेत होती. कोळसा घोटाळ्यात कुणाचे हात काळे झाले ? ते जरा बघा. पंतप्रधानांनी तुमची ही चूक सुधारली आहे.
सौजन्य डीडी न्यूज
सीतारामन् यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे !
१. आम्ही आमच्या १० वर्षांच्या कार्यकाळात भारतीय अर्थव्यवस्था जगातील पहिल्या ५ अर्थव्यवस्थांमध्ये आणून ठेवली. जी श्वेतपत्रिका आम्ही मांडली आहे, ती दायित्वाने मांडली आहे.
२. ‘यूपीए’च्या काळात राष्ट्रकुल स्पर्धांचा घोटाळा, कोळसा घोटाळा आदी कितीतरी घोटाळे झाले. त्यामुळे देशाची प्रतिमा डागाळली.
३. कोळसा घोटाळ्यामुळे देशाची पुष्कळ मोठी हानी झाली. देशात दीर्घकाळ कुठलाही नवा रोजगार निर्माण होऊ शकला नाही. आपल्याला कोळसाही बाहेरून मागवावा लागत असे.
४. आमचे सरकार सत्तेवर असतांना कोरोना महामारीचे संकट आले. असे झाले, तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या संकटाचा आम्ही सामना केला. अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरुन पाचव्या क्रमाकांवर आणली. अजूनही आपल्या अर्थव्यवस्थेला बळ देत आहोत.
५. आजचा विरोधी पक्ष हा मगरीचे अश्रू ढाळत आहेत.