हिंदु धर्म आणि संस्कृती यांचे श्रेष्ठत्व !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे विचारधन !
१. समाज आणि संस्कृती यांच्या विकासाची हिंदूंची पद्धत स्तिमित करणारी !
‘हिंदु धर्म आणि संस्कृती ही सर्व धर्म, पंथ अन् समाज यांना आत्मसात् कशी करून घेते, याविषयी प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजींशी यापूर्वी चर्चा झाली. परोपरीचे दाखले दिले. समाज आणि संस्कृती यांचा विकास अन् भरभराट करण्याची हिंदूंची पद्धत खरोखर स्तिमित करणारी आहे.
२. हिंदूंकडून संस्कृतीचा नाश कधीच झालेला नाही !
वास्तविक विषम संस्कृती एकमेकांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांना एकमेकांचा नाश करण्याविना अन्य काही मार्ग सापडत नाही. विषम संस्कृती एकमेकांच्या शेजारी आल्यास त्यांचे सलोख्याचे एकीकरण घडवून आणणे अशक्य आहे. तो ‘अँडल्स हक्सले’ सांगतो, तसे मोठ्या प्रमाणावर पद्धतशीर असत्याचा (Organised lying) प्रचार आजच्या इतका दुसर्या कोणत्याही युगात झाला नसेल. एकमेकांचा नाश करून समाज एकरूप करायचा, ही पद्धत रानटी आहे. समाज आणि संस्कृती यांचा प्रसार करण्याची हिंदूंची पद्धत रानटी कधीच नव्हती. हिंदूंनी आपल्या संस्कृतीचा प्रसार करतांना कोणत्याही संस्कृतीचा नाश कधीच केला नाही. तशी त्यांना आवश्यकताही भासली नाही. हिंदूंनी समन्वय आणि समाजविस्तार केला. ३० कोटी हिंदु प्रजेला एका संस्कृतीखाली आणणे अन् संस्कृतीच्या उत्पन्न झालेल्या छत्राखाली आणखी ४० ते ५० कोटी लोक आणणे, ही क्रिया करणार्या लोकांचे समाजशास्त्र जगातील सर्व लोकांच्या समाजशास्त्रापेक्षा श्रेष्ठ प्रतीचे नाही का ?
३. हिंदूंमध्ये द्वेषभावना नाही !
हिंदु लोकांच्या समाजशास्त्रात कोणताही मानव, समाज आणि कोणतीही पद्धत, विचार यांचा द्वेष नाही. हिंदूंच्या समाजरचनेचे नियम पाळल्यानंतर तत्त्वतः व्यक्तीला कोणत्याही पंथाचे अनुयायी होण्याची पूर्ण अनुमती होती आणि ती आजही आहे.
४. हिंदूंचा कडवा शत्रू असणार्या समाजाचे समाजशास्त्र हे हिंदु समाजशास्त्र असणे
पिरांची पूजा करणारे हिंदू समाजशास्त्रीय आचार पालटतील, तर अहिंदू होतील, अन्यथा प्राचीन धर्मशास्त्रानुरोधाने ते अहिंदू होण्याचे कारण नाही. आमची संस्कृती आणि समाजरचना उखडून टाकण्यास टपलेला मुसलमान समाज हिंदूंचा कडवा शत्रू आहे. ‘मुसलमानेतरांना म्हणजे काफिरांना मारणे, त्यांना मुसलमान करणे’, ही कुराणाची आज्ञाच आहे. महत्त्वाचे असे की, आज त्या समाजाचे समाजशास्त्र हे हिंदु समाजशास्त्र आहे. आज काश्मिरात हिंदूंच्या पद्धतीची जातीसंस्था शेष आहे. खोजा इत्यादी मोठमोठ्या मुसलमान जमातीत अनुवंशिक संपत्ती हिंदु कायद्याप्रमाणे विभागली जाते.
५. हिंदूंचे सामर्थ्य जाणा !
हिंदुस्थानची पहाणी करा ! मुसलमानांचा आक्रमक उर्मटपणा हा दुर्गुण सोडून दिल्यास त्यांच्या आचार-व्यवहाराची पद्धत हिंदूंसारखीच आहे. त्यांनी ती हिंदूपासूनच उचलली आहे. ज्या लोकांना ‘विश्वेदेव’ सभासद करता आले, त्यांना एक ‘अल्ला’ पचवता येणार नाही का ? हिंदूंची आचारपद्धत दृष्टीला अनुसरणारी आणि हितकारक आहे. ती धर्माचे नावही न घेता, परमेश्वराला कौलही न लावता पसरवण्यासारखी आहे. हिंदूंची वर्णव्यवस्था सर्वकालीन असल्याने त्या पद्धतीचा प्रचार जर बाह्य लोकात झाला, तर त्यांना हिंदू होण्यास अधिक वेळ लागत नाही. हिंदूंचे सामर्थ्य असे की, त्यांनी स्थानिक वाङ्मयाचे संस्कृतीकरण केले. ही युक्ती हिंदूंनी इतकी साधली की, बौद्ध धर्मियांना त्यांनी धर्मग्रंथ संस्कृतात लिहिणे भाग पाडले. व्रात्यस्तोमासारखे विधी करून हिंदूंनी संपूर्ण जातीच्या जाती हिंदु संस्कृतीमध्ये अंतर्भूत करून घेतल्या आहेत.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, जानेवारी २०२३)