कर्नाटक येथील सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा यांनी ‘साधनावृद्धी आणि साधक निर्मिती’ या विषयावरील सत्संगाची संहिता सिद्ध करण्यासाठी केलेले मार्गदर्शन !
‘सनातन संस्थेचा मूळ उद्देश ‘साधकांची आध्यात्मिक उन्नती होणे’, हा आहे; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने या वर्षी साधकांना ‘साधना वृद्धी आणि साधक निर्मिती’, हे ध्येय दिले होते. हे ध्येय साध्य करण्यासाठी कर्नाटकातील सनातनचे ७५ वे समष्टी संत आणि धर्मप्रचारक पू. रमानंद अण्णा यांनी जिज्ञासूंच्या बौद्धिक क्षमतेनुसार सत्संग घेण्यासाठी संहिता सिद्ध करण्याचे ठरवले. संहिता सिद्ध करण्यासाठी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केले आणि आमच्याकडून व्यापक चिंतनही करून घेतले. त्या वेळी त्यांनी आम्हाला केलेले मार्गदर्शन आणि त्यातून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
संहिता सिद्ध करतांना शिकायला मिळालेली सूत्रे
१. पू. अण्णा यांची संकल्पशक्ती अनुभवायला मिळणे : पू. अण्णांनी संहितेविषयी मार्गदर्शन केल्यावर आम्ही गुरुचरणी शरण जाऊन सेवा करण्यास आरंभ केला. सेवा करत असतांना आम्हाला विषय सुचत गेले. तेव्हा आम्हाला गुरूंची संकल्पशक्ती अनुभवायला मिळाली. पू. अण्णांच्या तळमळीमुळे संहिता सिद्ध करता आली.
२. पू. अण्णांना संहितेची रूपरेषा दाखवल्यावर त्यांनी गुरूंविषयी भाव निर्माण करणारी सूत्रे घेण्यास सांगितले. सनातन निर्मित ग्रंथांमधून संदर्भ घेतले.
३. पू. अण्णांनी आम्हाला जिज्ञासूंनी ‘प्रत्यक्ष कृती कशी करायची ?’ याविषयीची सूत्रे संहितेमध्ये घेण्यास सांगितले, उदा. वस्तूच्या आकारात पालट केल्यावर वस्तूची स्पंदने पालटली.
– सौ. लक्ष्मी पै (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), मंगळुरू, सौ. दीपा तिलक, बेंगळुरू, आधुनिक वैद्या (सौ.) वत्सला काशी, बेंगळुरू, श्री. श्रीकांत चौधरी, बेंगळुरू, सौ. शारदा योगिश, कुणीगल, कर्नाटक. (८.११.२०२३)
१. संहिता सिद्ध करण्यासाठी केलेले मार्गदर्शन
१ अ. संहिता सिद्ध करतांना कृतीच्या स्तरावर लक्षात घ्यावयाची सूत्रे
१. कुणालाही आपला पाठपुरावा करावा लागू नये, अशी तत्परतेने सेवा करावी.
२. सेवेचा आढावा नियमित आणि वेळेत द्यावा. सेवा समयमर्यादा घालून पूर्ण करावी.
३. सेवेतील अडचणी विचारून घ्याव्यात. सेवेची कार्यपद्धत आणि धोरण निश्चित करून घ्यावे.
४. उत्तम समन्वय करून संघभावाने सेवा करावी.
१ आ. संहितेच्या भाषेसंदर्भात सांगितलेली सूत्रे
१. संहितेत येणार्या क्लिष्ट शब्दांचे अर्थ सांगावेत. सूत्रे स्पष्ट होण्यासाठी योग्य उदाहरणे आणि कथा समाविष्ट कराव्यात.
२. संहिता शुद्ध, सोप्या भाषेत आणि योग्य उदाहरणांसह असावी, तसेच समाजातील जिज्ञासूंना साधक बनवण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक असावी.
१ इ. सर्व स्तरांवरील जिज्ञासूंना उपयुक्त ठरेल, अशी संहिता असावी !
१. सत्संगाला येणार्या जिज्ञासूंचा अभ्यास करून संहिता सिद्ध करावी. त्यातून सत्संगातील जिज्ञासूंना दायित्व घेऊन सेवा करण्यासाठी दिशा मिळायला हवी.
२. संहिता ‘समाजातील अधिवक्ते, उद्योगपती, वैद्य, शिक्षक, अभियंता, साधकांचे कुटुंबीय आणि धर्मप्रेमी, अशा वेगवेगळ्या व्यक्तींसाठी त्यांना त्यांच्या स्तरावर सुलभ रितीने समजेल’, अशी असावी आणि ‘सत्संग घेणार्यांनाही अभ्यास करून विषय सुलभतेने मांडता येईल’, अशी संहिता असावी.
३. शहर आणि ग्रामीण भागातील जिज्ञासूंसाठी वेगळी संहिता सिद्ध करावी.
१ ई. साधकांना प्रवचन घेण्यास साहाय्यक, अशी संहिता असावी !
१. समाजातील प्रत्येक जिवाला सणांचा उद्देश, त्यातील धार्मिक आचरण आणि सणांचे आध्यात्मिक महत्त्व यांविषयी समजेल आणि साधकांना प्रवचन घेण्यास साहाय्यक ठरेल, अशी संहिता असावी.
२. धर्म, धार्मिक आचरण आणि आचारधर्म इत्यादी विषयांच्या संदर्भात विचारल्या जाणार्या प्रश्नांना समर्पक उत्तरे देण्यासाठी संहितेचा उपयोग व्हावा.
१ उ. संहिता सिद्ध करण्याची सेवा करतांना साधनेच्या दृष्टीने प्रयत्न करणे
१ उ १. भावाच्या स्तरावर
अ. ‘आपल्यातील भावानुसार संहितेत भाव आणि चैतन्य येते’, या दायित्वाची जाणीव ठेवून साधकांनी अधिकाधिक श्रद्धा, कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव ठेवून सेवा करावी.
आ. ‘साधकांची बुद्धी शुद्ध करण्यासाठी गुरूंनी सेवा दिली आहे’, ही जाणीव सतत असावी. ईश्वराचे साहाय्य घेऊन आणि सतत अनुसंधानात राहून सेवा करावी. गुरूंच्या चैतन्याचा लाभ घेऊन स्वतःला सेवेत समर्पित करावे.
इ. संहिता वाचतांना त्यातील स्पंदनांचा अभ्यास करावा. संहिता वाचल्यावर भावजागृती होईपर्यंत त्यात सुधारणा करावी.
१ ऊ. स्वभावदोषांचा अभ्यास करणे
१. ‘सेवा करतांना आज्ञापालन होत आहे ना ?’, याचा अंतर्मुख होऊन अभ्यास करावा.
२. सतत स्वतःकडे न्यूनपणा घेऊन इतरांकडून शिकत रहावे; परंतु न्यूनगंड नसावा.
३. इतरांचे स्वभावदोष पहाण्यापेक्षा ‘इतरांमधील कोणता गुण स्वतःमध्ये अल्प आहे’, याचा अभ्यास करावा.
४. सेवा करतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाचे प्रयत्न करावेत.
५. सेवा करतांना स्वतःमध्ये साधकत्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत.
२. सेवेचे चिंतन करतांना शिकायला मिळालेली सूत्रे !
अ. गुरूंच्या संकल्पशक्तीचा लाभ घेऊन तत्परतेने सेवांचे चिंतन व्हायला हवे.
आ. सेवा आणखी चांगल्या रितीने करण्यासाठी इतरांना विचारून तिच्यात पालट करावा.
इ. नवीन संकल्पना आल्यावर त्या सेवेची कार्यपद्धत आणि धोरण यांविषयी चिंतन करून गुरूंना अपेक्षित अशा प्रकारे सेवा करावी.
ई. ‘कोणत्या साधकाकडे कोणते कौशल्य आहे आणि त्याचा उपयोग गुरुकार्यात कसा करून घेता येईल ?’ याचा अभ्यास करावा.
उ. साधकांना त्यांचे स्वभावदोष आणि अहं यांची जाणीव करून देऊन त्यांना पुढच्या टप्प्याला घेऊन जाण्यास साहाय्य करावे.
पू. अण्णांच्या संकल्पनेतून आम्हाला शिकायला मिळालेली सूत्रे गुरुचरणी समर्पित करत आहोत. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा आम्हा सर्वांकडून व्हावी आणि आम्हाला त्यांच्या चरणी समर्पित करून घ्यावे’, अशी त्यांच्या पावन चरणी प्रार्थना करतो. हे लिखाण आमच्याकडून लिहून घेतल्याबद्दल गुरु चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– सौ. लक्ष्मी पै (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), मंगळुरू, सौ. दीपा तिलक, बेंगळुरू, आधुनिक वैद्या (सौ.) वत्सला काशी, बेंगळुरू, श्री. श्रीकांत चौधरी, बेंगळुरू, सौ. शारदा योगिश, कुणीगल, कर्नाटक. (८.११.२०२३)