लोकसभेत अर्थमंत्र्यांकडून श्‍वेतपत्रिका सादर !

निर्मला सीतारामन्

नवी देहली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी लोकसभेत श्‍वेतपत्रिका सादर केली असून यावर उद्या, ९ फेब्रुवारी या दिवशी चर्चा होणार आहे. या श्‍वेतपत्रिकेत २०१४ पूर्वी आणि नंतर भारतीय अर्थव्यवस्थेतील चढ-उतारांची माहिती दिली जाईल.

श्‍वेतपत्रिका म्हणजे काय ?

एखाद्या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भात केलेले धोरणविषयक निवेदन किंवा सादर केलेली माहिती, असे श्‍वेतपत्रिकेचे सर्वसाधारण स्वरूप असते. श्‍वेतपत्रिकेची निर्मिती ब्रिटिश संसदीय शासनपद्धतीतून झाली आहे.