शाळेतील हिंदु मुलींना कपाळावर टिकली, हातात बांगडी घालू देण्याविषयी अटकाव करू नये !
समस्त हिंदु बांधव विद्यार्थी संघाची हडपसर (पुणे) येथील ‘साधना’ नामक शालेय प्रशासनास निवेदनाद्वारे मागणी !
हडपसर (जिल्हा पुणे) – आपल्या शाळेतून मुलींना कपाळावर टिकली, गंध लावू न देण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याविषयी आमच्याकडे अनेकदा तक्रारी आल्या आहेत, तसेच पालक यावर कडक उपाययोजना होण्यासाठी अजूनही लढा देण्यास सिद्ध आहेत. आपल्या शाळेतील चालू असलेल्या या गोष्टींवर शालेय प्रशासनाने लक्ष घालून त्वरित सुधारणा कराव्यात, अशा मागणीचे निवेदन हडपसर येथील ‘साधना’ शाळेत समस्त ‘हिंदु बांधव विद्यार्थी संघ’च्या वतीने देण्यात आले आहेत, तसेच शाळेने आवश्यक त्या सुधारणा न केल्यास लोकशाही मार्गाने लढा देऊन शाळेला धडा शिकवण्यासाठी आम्ही मागे पुढे पहाणार नाही, अशी चेतावणीही या वेळी देण्यात आली.
या वेळी सर्वश्री ऋषिकेश कामथे, करण गोते, सुशिल शिंदे, गणेश शिंदे, कृष्णा लोया, संतोष वेदपाठक आदी गोरक्षा सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्याचे गोरक्षक आणि समस्त हिंदु बांधव, महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुला-मुलींना कपाळावर गंध लावणे, तसेच बांगड्या घालणे यांवर कोणतेच शालेय प्रशासन बंदी आणू शकत नाही. यावर बंधने आणणे म्हणजे घटनेतील तरतुदींवर आक्षेप असण्यासमान आहे, भारतामध्ये अभिव्यक्तीस्वातंत्र्य असल्याने आपण अथवा कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा यंत्रणा धर्माचे पालन करण्यावर प्रतिबंध लावू शकत नाही, असे निवेदनात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी का करावी लागते ? शाळा प्रशासनाच्या ते लक्षात येत नाही का ? |