पाकमधील हिंदूंवरील अत्याचार !
‘पाकिस्तानातील हिंदूंच्या हितासाठी आवाज उठवणारे मुंबई येथील महेश वासू यांनी वर्ष २०२३ मधील हिंदूंवर झालेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांचा आणि नरसंहाराचा पाढाच वाचून दाखवला आहे. त्यांनी प्रसारित केलेल्या अहवालात स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेली वृत्ते आणि पुरावे यांचा आधार घेतला आहे. याची माहिती त्यांनी ‘सनातन प्रभात’ला पाठवली. त्यातील १ सूत्र प्रतिदिन देत आहोत.
ई. ७८ हिंदूंचे मृतदेह हे झाडांवर अथवा घरांत लटकत असल्याच्या घटना समोर आल्या. यांमध्ये काही जणांचे मृतदेह हे विहिरीतून काढण्यात आल्याचाही समावेश आहे.