महाशिवरात्रीच्या निमित्ताने सनातनचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे अधिकाधिक वितरण करा !
साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !
८.३.२०२४ या दिवशी महाशिवरात्र आहे. त्या निमित्ताने आपल्याला सनातनचे ग्रंथ, लघुग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने अधिकाधिक जिज्ञासूंपर्यंत पोचवण्याची सुवर्णसंधी लाभली आहे. या संधीचा लाभ करून घेण्यासाठी साधकांनी पुढे नमूद केलेले ग्रंथ आणि प्रसारसाहित्य यांचे अधिकाधिक वितरण होण्यासाठी प्रयत्न करावेत.
१. सनातनचे ग्रंथ
१ अ. शिवाविषयी अध्यात्मशास्त्रीय विवेचन : या ग्रंथात शिवाविषयी सर्वसाधारणतः इतरत्र कुठेही न आढळणारे अध्यात्मशास्त्रीय विवेचन करण्यावर भर दिला आहे. शिवाची काही नावे आणि गंगा, तिसरा डोळा, नाग, भस्म, रुद्राक्ष इत्यादी शिवाच्या वैशिष्ट्यांचा आध्यात्मिक अर्थ; ‘महातपस्वी, भुतांचा स्वामी, विश्वाची उत्पत्ती करणारा’, यांसारखी आध्यात्मिक वैशिष्ट्ये अन् कार्ये; रुद्र, कालभैरव, नटराज इत्यादी रूपे, तसेच ज्योतिर्लिंगे इत्यादींविषयीच्या तात्त्विक विवेचनासह ‘भस्म लावणे, नंदीच्या शिंगांमधून शिवलिंगाचे दर्शन घेणे, शिवाला बेल आणि अक्षता वहाणे; पण हळद-कुंकू न वहाणे’, यांसारखे उपासनेशी संबंधित प्रायोगिक विवेचनही शास्त्रासह दिले आहे. ‘शृंगदर्शन, शिवाला बेल वहाणे, अभिषेक करणे’ इत्यादींच्या वेळी सूक्ष्मातून नेमकी काय प्रक्रिया घडते ?’, हे सर्वसामान्य व्यक्तीला कळू शकत नाही. हे कळण्याची क्षमता असलेल्या सनातनच्या साधकांनी केलेली ‘सूक्ष्म परीक्षणे’ आणि काढलेली ‘सूक्ष्म-चित्रे’ हे या ग्रंथांचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. शिवाविषयीचे हे अध्यात्मशास्त्रीय विवेचन शिवभक्तांना आणि शिवाची सांप्रदायिक साधना करणार्यांना निश्चितच उपयुक्त ठरेल.
१ आ. शिवाच्या उपासनेमागील शास्त्र : या ग्रंथात ‘शिवपूजेपूर्वी पूजकाने स्वतःला भस्म कसे लावावे ? शिवासमोर कोणती रांगोळी काढावी ? शिवाला कोणती फुले किती संख्येने वहावीत ? त्याला कोणत्या उदबत्तीने ओवाळावे ? शिवाला कोणत्या गंधाचे अत्तर अर्पण करावे ?’ आदींचे विवेचन केले आहे. शिवाची दैनंदिन उपासना करणार्यांसह ‘सोळा सोमवार, श्रावणी सोमवार, शिवामूठ, हरितालिका, महाशिवरात्र’, यांसारखी व्रते अन् उत्सव साजरा करणार्या शिवभक्तांनाही या ग्रंथात केलेले त्या संबंधीचे विवेचन उपयुक्त ठरेल.
१ इ. ‘शिव’ हा लघुग्रंथ
१ ई. ‘देवता, अध्यात्मशास्त्र, साधना, धार्मिक कृती, आचारधर्म’ इत्यादींविषयीचे बहुमोल ज्ञान असलेले ग्रंथ
२. देवतांच्या नामपट्ट्या
विविध देवतांच्या नामपट्ट्या, तसेच वास्तूची शुद्धी करण्यासाठी उपयुक्त असे वास्तूछत.
३. देवतांची सात्त्विक चित्रे आणि पदके
शिव, दत्त, गणपति, श्रीराम, श्रीकृष्ण, मारुति, श्री दुर्गादेवी, श्री लक्ष्मी आणि अष्टदेवता यांची लहान, मध्यम आणि मोठ्या आकारांतील चित्रे (फ्रेमसहित), तसेच शिव-दुर्गा, दत्त-गणपति, कृष्ण-लक्ष्मी, राम-मारुति, यांची चित्रे असलेली पदके (लॉकेट्स) धाग्यासहित.
ग्रंथ, उत्पादने इत्यादीचे प्रदर्शन आयोजित करून प्रदर्शनस्थळी ग्रंथांची माहिती देणारे फ्लेक्स लावू शकतो. साधक आणि वाचक यांनी वरील प्रसारसाहित्य स्थानिक वितरकांकडून घ्यावे. वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांनी उपरोल्लेखित ग्रंथ अन् अन्य प्रसारसाहित्य यांची मागणी स्थानिक वितरकांकडे किंवा ९३२२३१५३१७ या संपर्क क्रमांकावर अथवा sanatanshop.com या संकेतस्थळावर करावी. (४.१.२०२४)
सनातनचा ग्रंथसागर जनमानसापर्यंत पोचवण्यासाठी प्रयत्न करा !अखिल विश्वात धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची पायाभरणी करण्यात आणि जिज्ञासूंना धर्माचरणी बनवण्यात सनातनने प्रकाशित केलेल्या ग्रंथांचा मोलाचा वाटा आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शन लावतांना अधिकाधिक जणांपर्यंत ग्रंथ पोचवण्यासाठी प्रयत्न करावेत. ‘प्रदर्शनस्थळी अधिकाधिक ग्रंथ प्रदर्शित (डिस्प्ले) केले जातील’, असे पहावे. जागेअभावी काही ग्रंथ प्रदर्शित करणे शक्य नसेल, तर ग्रंथांची माहिती विशद करणारी ग्रंथसूची प्रदर्शनात ठेवावी. अशा वेळी शक्य असल्यास नवीन प्रकाशित झालेल्या ग्रंथांची वेगळी मांडणी करू शकतो. (४.१.२०२४) |