Church Converted InTo Mosque : तुर्कीयेमध्ये आणखी एका चर्चचे मशिदीत रूपांतर !
अंकारा (तुर्कीये) – इस्लामी देशांचे ‘खलिफा’ (मुसलमानांचे सर्वोच्च नेते) बनण्याचे स्वप्न पहाणारे तुर्कीयेचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान यांच्या सरकारने ख्रिस्त्यांचे मुसलमानांवर वर्चस्व दाखवण्याचे प्रीतक असणार्या चर्चचे मशिदीत रूपांतर करण्याची प्रक्रिया चालू केली आहे. तुर्कीयेच्या इस्तंबूल शहरात असलेल्या एका चर्चचे मशिदीत रूपांतर करणे चालू असून ते काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. तुर्कीये सरकारने ही घोषणा केली आहे. यापूर्वी तुर्कीयेच्या एर्दोगान सरकारने हागिया सोफिया चर्चचे मशिदीत रूपांतर केले होते.
Another Church converted into a Mosque in Turkiye !
In India, Mosques were erected on Dharmik sites of Hindus.
When Hindus assert their claims to these sites, religious fanatics' blood boils.
What do such people have to say on Turkiye's actions?#Byzantinechurch… pic.twitter.com/kWtpYuQdxA
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 7, 2024
तुर्कीयेकडून तोडण्यात आलेले कॅथोलिक समाजाचे हे चर्च सहाव्या शतकात बांधले गेले होते. हागिया सोफिया आणि आता चोरा चर्चचे मशिदीत रूपांतर करून एर्दोगन ख्रिश्चन धर्मावर इस्लामचे वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचे विश्लेषकांचे म्हणणे आहे. तुर्कीये एकामागून एक चर्चचे मशिदीत रूपांतर करत आहेत.
जागतिक इस्लामी संघटनेकडून मौन !
अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेनंतर जागतिक इस्लामी संघटनेने गरळओक करत यावर टीका केली होती. मशीद तोडून मंदिर बांधल्याचे तिचे म्हणणे होते. तुर्कीयेत चर्चचे मशिदीत रूपांतर होत असतांना मात्र या संघटनेने मौन बाळगले आहे. (इस्लामी संघटनेचा दुटप्पीपणा ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|