Australia Indian Origin Senator : ऑस्ट्रेलियाच्या संसदेत भारतीय वंशाचे पहिले खासदार बनले वरुण घोष !
भगवद्गीतेवर हात ठेवून घेतली शपथ !
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) – भारतीय वंशाचे वरुण घोष यांनी ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. घोष हे ऑस्ट्रेलियाच्या संसदेचे पहिले भारतीय वंशाचे खासदार बनले आहेत. निवडून आल्यानंतर त्यांनी भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेतली.
सौजन्य : एकॉनॉमिक टाइम्स
काय म्हणाले ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान ?
ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज म्हणाले की, नवीन सिनेटर (खासदार) वरुण घोष यांचे स्वागत आहे. तुम्ही आमच्या समूहाचा भाग बनला, याचा मला पुष्कळ आनंद झाला.
घोष यांच्यासंदर्भात ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग म्हणाले की, हे पुष्कळ विशेष आहे की, तुम्ही आता लेबर पक्षाच्या खासदारांच्या समूहाचे भाग झाला आहात. मला विश्वास आहे की, सिनेटर वरुण घोष त्यांच्या समुदायाचा आणि पश्चिम ऑस्ट्रेलियातील लोकांचा आवाज बनतील.
Varun Ghosh becomes the first Indian origin senator in the Australian parliament
Took oath by placing hand on the Bhagavad Gita !
Australian PM Anthony Albanese tweeted 'Welcome Varun Ghosh, our newest Senator from Western Australia. Fantastic to have you on the team.'
'I was… pic.twitter.com/3TfVLAPKvN
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 7, 2024
खासदारकीसाठी निवड झाल्यानंतर वरुण घोष यांची पहिली प्रतिक्रिया !
मला चांगले शिक्षण मिळण्याचे भाग्य लाभले. उच्च दर्जाचे शिक्षण आणि प्रशिक्षण प्रत्येकासाठी उपलब्ध असले पाहिजे, यावर माझा ठाम विश्वास आहे.
कोण आहेत वरुण घोष?
३८ वर्षीय वरुण घोष हे पर्थमध्ये कार्यरत असून व्यवसायाने अधिवक्ता आहेत. ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’मधून त्यांनी कला आणि कायद यांची पदवी घेतली. त्यांनी अमेरिकेत न्यूयॉर्क आणि वॉशिंग्टन येथे अनुक्रमे वकिली व्यसाय अन् जागतिक बँकेसाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. जेव्हा ते १७ वर्षांचे होते, तेव्हा ते त्यांच्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियाला आले.