MEA Advisory : भारतियांनी म्यानमारमधील राखीन राज्यातून सुरक्षित ठिकाणी निघून जावे !
भारताकडून म्यानमारमध्ये रहाणार्या भारतियांसाठी मार्गदर्शक सूचना !
नवी देहली – भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्यानमारमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तेथे रहाणार्या मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या आहेत. यामध्ये भारतीय नागरिकांना तेथील राखीन प्रांतात न जाण्यास सांगण्यात आले आहे. राखीन राज्यात रहाणार्या भारतियांनी तातडीने सुरक्षित ठिकाणी जावे, असे यात सांगण्यात आले आहे. ‘चीन म्यानमारच्या बंडखोरांच्या माध्यमातून ईशान्य भारतात अशांतता पसरवू शकतो’, अशी भारताला चिंता आहे. ऑक्टोबर २०२३ पासून राखीन राज्य आणि इतर अनेक भागात वांशिक गट अन् म्यानमार सैन्य यांच्यात तीव्र संघर्ष चालू आहे.
Advisory for Indian nationals traveling to or based in #Rakhine State, Myanmar@MEAIndia pic.twitter.com/ObPzcv2Obn
— India in Myanmar (@IndiainMyanmar) February 6, 2024
फेब्रुवारी २०२१ मध्ये, म्यानमारमधील सैन्याने लोकशाही सरकारची हकालपट्टी केली आणि सत्तेवर नियंत्रण मिळवले. यानंतर सैन्यप्रमुख जनरल मिन आंग हलाईंग यांनी स्वत:ला देशाचे पंतप्रधान घोषित केले. सैन्याने देशात २ वर्षांची आणीबाणी घोषित केली होती. तेव्हापासून म्यानमारमध्ये गृहयुद्ध चालू आहे.