माहीम रेल्वेरुळांवर झोपडपट्टीतील लोकांची वसाहत !
मुंबई – हार्बर रेल्वे मार्गावरील माहीम या रेल्वेस्थानकाजवळील रेल्वेरुळांवर झोपडपट्टीतील अनेक लोकांनी संसार थाटला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. हे लोक येथे स्वयंपाक करणे, कपडे धुणे आदी कामे करत आहेत. त्यांची लहान मुले रुळांवर बसून खेळत आहेत. हे रेल्वेप्रवाशांची सुरक्षा आणि त्या लोकांची सुरक्षा या दोन्ही दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. रेल्वेरुळालगतच्या लोकांकडून पाण्याचे फुगे किंवा दगड फकणे, चोर्या करणे हे प्रकार मोठ्या प्रमाणात यापूर्वी घडलेले आहेत. हा सर्व परिसर अत्यंत अस्वच्छही झाला आहे. अचानक एखादी रेल्वे या रुळावर वळवली, तर मोठी जीवितहानीसुद्धा घडू शकते. तसेच रेल्वेरुळांवर अशा प्रकारे अनधिकृत वसाहत करणेही गुन्हा आहे.
या नागरिकांवर रेल्वे प्रशासन काही कारवाई करणार कि नाही ? असा प्रश्न रेल्वे प्रवाशांना पडला आहे. यांच्यापैकी कुणी बांगलादेशी आहेत का ? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
संपादकीय भूमिका :लोक एवढ्या मोठ्या प्रमाणात रहात असून रेल्वेप्रशासनाने आतापर्यंत काहीच कार्यवाही का केली नाही ? याला उत्तरदायी अधिकार्यांवरही कारवाई झाली पाहिजे ! |