दायित्व घेऊन तळमळीने सेवा करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या प्रती भाव असलेले सातारा येथील श्री. महेश गायकवाड (वय ४५ वर्षे) !

‘श्री. महेश गायकवाड गेली १२ वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहेत. ते सर्व सेवा नियमितपणे आणि परिपूर्ण करतात. सातारा जिल्ह्यातील साधकांना श्री. महेश गायकवाड यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

श्री. महेश गायकवाड

१. सौ. माधुरी आणि श्री. माधव फडके, गोडोली, सातारा.

१ अ. हसतमुख आणि आनंदी : ‘महेशदादा सतत हसतमुख आणि आनंदी असतात. त्यामुळे त्यांच्या समवेत सेवा करतांना साधकांना ताण येत नाही.

१ आ. सर्वांशी जवळीक करणे : महेशदादा कधीच कुणावर रागावत नाहीत आणि ते कधी कुणाविषयी प्रतिक्रियाही व्यक्त करत नाहीत. ते प्रत्येक गोष्टीत सकारात्मक दृष्टीकोन ठेवून सगळ्यांशी आपुलकीने बोलतात. त्यामुळे त्यांची सर्व साधकांशी जवळीक आहे.

१ इ. साधनेची ओढ : ते त्यांची वैयक्तिक कामे सांभाळून साधना आणि सेवा यांसाठी वेळ देतात. त्यांच्या मनात सतत साधनेचा विचार असतो.

१ ई. सेवेची तळमळ

१. मागच्या वर्षी त्यांच्या पाठदुखीवर उपचार चालू होते, तरीही ते २ मास प्रतिदिन रात्री १ – २ वाजता बसस्थानकावर दैनिक ‘सनातन प्रभात’चे ‘पार्सल’ उतरवून घेण्यासाठी जायचे. कधी त्या ‘पार्सल’ समवेत इतरही काही ‘पार्सल’ येत असे. ते त्या ‘पार्सलां’च्या संबंधित ज्या काही सेवा त्यांच्याकडे असतील, त्या पूर्ण करूनच घरी जायचे. त्यांना पाठदुखीचा त्रास होत असूनही त्यांनी सेवेत कधी खंड पडू दिला नाही.

२. ‘महेशदादा सातारा जिल्ह्यातील सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ, तसेच सातारा येथील एका केंद्रातील दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचे वितरण करण्याच्या सेवा दायित्वाने करतात. एखाद्या साधकाला कधी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायला अडचण असेल, तेव्हा ते त्या साधकाकडील अंकांचेही वितरण करतात.

३. अकस्मात् एखाद्याकडे सात्त्विक उत्पादने पोचवण्याची सेवा येते, तेव्हा महेशदादा इतरांकडून साहाय्याची अपेक्षा न करता ती सेवा लगेच स्वीकारून मनापासून करतात. ते त्यांच्याकडे येणारी प्रत्येकच सेवा आनंदाने स्वीकारतात.

४. ते प्रत्येक सेवेचे नियोजन करूनच सेवेला आरंभ करतात.

१ उ. भाव : महेशदादांचा ‘देवच सर्व करून घेतो’, असा भाव असतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलतांना किंवा ते सेवा करतांना त्यांच्यात अहं जाणवत नाही. ‘सेवेला वेळ देता यावा’, यासाठी त्यांनी स्वतःच्या व्यवसायातील काही वेळ न्यून केला आहे, तरी त्यांच्या मनात ‘गुरुदेव मला काही न्यून पडू देत नाहीत’, असा भाव असतो. गुरुदेवांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे.’

२. सौ. मैथिली फडके, गोडोली, सातारा.

२ अ. वेळचे गांभीर्य : ‘महेशदादा अनावश्यक न बोलता नेहमी साधना आणि सेवा या संबंधीच बोलतात. ते कधीही वेळ वाया घालवत नाहीत. ते ‘सेवेसाठी अधिकाधिक वेळ कसा देता येईल’, यासाठी सतत प्रयत्नरत असतात.

२ आ. निरपेक्ष : आमच्या घरातील एका व्यक्तीशी महेशदादांची चांगली जवळीक आहे. महेशदादा त्यांना नेहमी सकारात्मक दृष्टीकोन देऊन त्यांना देवाच्या कृपेची जाणीव करून देतात. महेशदादा गेल्या अनेक मासांपासून त्यांना हे सांगत आहेत; पण ‘त्यांनी ते ऐकायला हवे’, अशी महेशदादा अपेक्षा ठेवत नाहीत. ते स्वतःची साधना म्हणून निरपेक्षपणे सांगतात.’

३. सौ. प्रियांका शितोळे, गोडोली, सातारा.

३ अ. शांत : ‘महेशदादांकडे पाहिल्यावर चैतन्य जाणवते आणि एक नवीन ऊर्जा मिळते. त्यांच्याकडे कितीही सेवा असल्या, तरी त्यांच्या चेहर्‍यावर कधीही ताण दिसत नाही. त्यांच्याकडे पाहून शांत वाटते.

३ आ. इतरांना साहाय्य करणे : त्यांच्याकडे आपण कधी कुठलेही साहाय्य मागितले, तर ते साहाय्य करायला लगेच सिद्ध असतात.

३ इ. काही वेळा क्षणभर महेशदादांमध्ये गुरुदेवांचे अस्तित्वही जाणवते.’

(वरील सर्व सूत्रांचा दिनांक १६.११.२०२४)