‘पितांबरी’चे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष सोहळा पार पडला !

सनातन संस्थेच्या वतीने श्रीरामाचे चित्र आणि शुभेच्छापत्र भेट !

ठाणे – ‘पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा.लि.’ चे व्यवस्थापकीय संचालक श्री. रवींद्र प्रभुदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त ५ फेब्रुवारी या दिवशी पितांबरीच्या ठाणे येथील कार्यालयात एका विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिवर्षीप्रमाणे श्री. प्रभुदेसाई यांनी त्यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त १६ सामाजिक संस्थांना प्रत्येकी ६१ सहस्र रुपयांचा धनादेश दिला. या सोहळ्यात श्रीराममंदिर आंदोलनात कारसेवक म्हणून सहभागी झालेल्या पितांबरीमधील सहकार्‍यांचा यथार्थ सन्मान करण्यात आला. या वेळी श्री. प्रभुदेसाई यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने श्रीमती स्मिता नवलकर यांनी श्रीरामाचे चित्र आणि शुभेच्छापत्र दिले.