मर्दानी आणि शौर्याच्या खेळांनी ‘शिवजयंती’ साजरी करावी !
पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांचे आवाहन
पुणे – यंदाची ‘शिवजयंती’ विविध वैचारिक उपक्रमांनी साजरी करावी. शाळांमध्ये वक्तृत्व, निबंध, नाट्य स्पर्धा आयोजित कराव्यात. मर्दानी खेळ, शौर्य उपक्रम राबवावेत. अशा कार्यक्रमांसाठी प्रशासनाकडून सर्व सुविधा पुरवल्या जातील, असे आश्वासन प्रशासनाकडून आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले.
१९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेमध्ये बैठक झाली. या बैठकीस प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्ती आणि परिसरातील स्वच्छता करावी, विद्युत् रोेषणाई आणि सुशोभीकरण करावे, मिरवणूक मार्गांवरील वाहतूककोंडी टाळावी, महापालिकेच्या इमारतींवर विद्युत् रोेषणाईमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा सिद्ध करावी, मंडळांना विविध प्रकारच्या सुविधा द्याव्यात, अशा सूचना प्रारंभी शिवप्रेमी संघटनांतील सदस्यांनी केल्या.