उपमुख्यमंत्री अजित पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष !
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि ‘घड्याळ’ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांना मिळाले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटासमोर पुष्कळ आव्हाने निर्माण झाली असून त्यांना ७ फेब्रुवारीपर्यंतचा वेळ आहे. त्या कालावधीत पक्षाचे नवीन नाव आणि चिन्ह यांविषयी विचारणा करू शकतात. त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी ३ पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.