राजस्थानमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात ‘श्रीराम नामसंकीर्तन ’ पार पडले !
सोजत सिटी (राजस्थान) – अयोध्येतील श्रीराममूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील सेजलमाता मंदिरात सामूहिक श्रीराम नामसंकीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी मंदिर परिसरात रांगोळी, फुले आणि दिवे यांनी सजावट करण्यात आली होती. कार्यक्रमाच्या शेवटी प्रभु श्रीराम आणि सेजलमाता यांची आरती करण्यात आली. या वेळी ‘दुर्गा वाहिनी’च्या विभाग संयोजिका निमिषा वैष्णव, रजनी वैष्णव आणि त्यांचे कुटुंब, धर्मप्रेमी लीला देवी, सनातन संस्थेचे श्री. दीपक लढ्ढा, सौ. अर्चना लढ्ढा, विद्यार्थिनी अन् अन्य भाविक उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण : मंदिराच्या सजावटीसाठी भाविकांनी सनातन संस्थेच्या साधकांना साहाय्य केले.
हुनगाव (राजस्थान) – अयोध्येतील श्रीराममंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने येथील श्याम मंदिराच्या प्रांगणात ‘श्रीराम नामसंकीर्तना’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सनातन संस्थेचे श्री. दीपक लढ्ढा यांनी प्रभु श्रीरामाविषयीची माहिती आणि त्यांची वैशिष्ट्ये उपस्थितांना सांगितली. या वेळी ‘श्रीराम’ विषयावरील पाक्षिक ‘सनातन प्रभात’चा हिंदी भाषेतील विशेषांक उपस्थित धर्मप्रेमींना वितरित करण्यात आला.
वैशिष्ट्यपूर्ण : श्याम मंदिराचे श्री. गिरीधर वैष्णव आणि श्री. जय प्रकाश वैष्णव यांनी सनातन संस्थेचा आकाशकंदिल अन् श्रीरामाच्या नामपट्ट्या यांद्वारे मंदिरात सजावट केली.