Malegaon : ‘मालेगावला ‘मिनी पाकिस्तान’ संबोधल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या !’ – माजी आमदार आसिफ शेख

  • नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांच्या प्रकरणी माजी आमदार आसिफ शेख यांचे विधान

  • क्षमा न मागितल्यास फौजदारी खटला प्रविष्ट करण्याची धमकी

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख

नाशिक – येथील मालेगाव शहराला भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मध्यंतरी ‘मिनी पाकिस्तान’ म्हणून संबोधले होते. या प्रकरणी आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार आसिफ शेख यांनी करून आमदार नितेश राणे यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणी ‘राणे यांनी मालेगावकर आणि मुसलमान बांधव यांची माफी मागावी. ती न मागितल्यास मालेगाव न्यायालयात फौजदारी खटला प्रविष्ट करू’, अशीही धमकीही त्यांनी नोटिसीद्वारे केली आहे. (क्षमा कुणी मागावी ? जे दंगल घडवतात, सार्वजनिक मालमत्तेची हानी करतात, अशांनी खरेतर क्षमा मागायला हवी ! – संपादक)

भाजपचे आमदार नितेश राणे

येथे झालेल्या ३०० कोटी रुपयांच्या वीजचोरीच्या प्रकरणी आमदार नितेश राणे यांनी हा पैसा ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लँड जिहाद’साठी वापरला जात असल्याचा आरोप केला होता.

संपादकीय भूमिका

ज्यांच्यावर दंगल घडवल्याप्रकरणी गुन्हा नोंद होतो, अशांना ‘धार्मिक भावना दुखावल्या’, असे म्हणण्याचा अधिकारच काय ?