‘निर्विचार’ हा नामजप ऐकतांना साधकाला आलेल्या अनुभूती
१. ‘एकदा रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ध्वनीक्षेपकावर ‘निर्विचार’ हा नामजप लावला होता. नामजपाला आरंभ झाल्यावर आरंभी माझे मन एकाग्र होत नव्हते.
२. थोड्या वेळाने माझे डोके जड झाले आणि माझ्या भ्रूमध्यावर संवेदना जाणवू लागल्या.
३. त्यानंतर माझ्या श्वासाची गती मंद होत जाऊन ‘काही क्षण श्वास बंद झाला कि काय ?’, असे मला वाटले. त्या वेळी ‘काळ पूर्णपणे थांबला आहे’, असे मला वाटत होते. माझ्या मनातील विचार पूर्णपणे थांबले होते.
४. नंतर माझे लक्ष ‘निर्विचार’ या शब्दाच्या ध्वनीवर केंद्रित झाले. तेव्हा तो ध्वनी मला माझ्या कानांनी ऐकू येत नव्हता; परंतु मला तो जप मात्र स्पष्टपणे ऐकू येत होता. ‘कानांनी न ऐकू येता जप कसा काय ऐकू येत आहे ?’, असे कुतूहल माझ्या मनात निर्माण झाले. तेव्हा ‘निर्विचार’ हा ध्वनी आसमंतात कुठेतरी घुमत आहे आणि आकाशवाणीप्रमाणे तो दूरवरून ऐकू येत आहे’, असे माझ्या लक्षात आले.’
– अधिवक्ता योगेश जलतारे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
|