एखाद्या घटनेमुळे महायुतीत फरक पडत नाही ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई – भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या संदर्भातील घटनेची सखोल चौकशी गृहखाते करत आहे. यापूर्वी महाराष्ट्रात अशा घटना सहस्रो वेळा घडल्या आहेत; पण त्या घटनांचे उदाहरण देऊन आजची घटना झाकता येणार नाही. गोळीबार करणे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत. आम्हाला ही घटना मान्य नाही. झालेला प्रकार दुर्दैवी असून पुढील काळात राज्याला गालबोट लागणार नाही, अशी काळजी सर्वांनीच घेतली पाहिजे. गृहखात्याचा अहवाल आल्यानंतर पोलीस कारवाई करतीलच; पण पक्षही कारवाई करणार आहे. शिंदे-फडणवीस यांच्यात कोणतीही वर्चस्वाची लढाई नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

महायुती लवकरच आपल्या जागा जाहीर करणार आहे. प्रत्येक मतदारसंघात ५१ टक्के मतदान घेऊन जिंकून येणे आवश्यक आहे.