भगवंताकडून येणार्या वादळात बेदरकारपणे झेप घेणे महत्त्वाचे !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !
‘जीवनात असा एक क्षण येतो की, ज्या वेळी झंझावाती वादळ (तुफान) उसळते. भगवंताचे वादळ असते ते. त्या क्षणी जो सावध राहून वादळात (तुफानात) बेदरकारपणे झेप घेतो. वादळाशी (तुफानाशी) झुंजतो. त्याचीच नाव पैलतीराला जाते. ते वादळच (तुफानच) नाव पैलतीराला नेते. भगवंताचे वादळ (तुफान) नाव बुडवत नाही. भगवंताचे वादळ (तुफान) नाव पैलतीरी पोचवते ! त्याची गती केवळ भगवानच होते. तोच प्रभु, पोषणकर्ता, तोच साक्षी, तिथेच त्याचा निवास, तेच त्यांचे निधान, तोच आसरा, तोच सखा ! हा क्षण, हा झंझावात ज्याच्या जीवनात येतो, तोच भाग्यवान. बाकीचे सगळे अभागी.
असे क्षण येतात, त्या क्षणी सावध राहिला, चेतला, तर प्रचंड उपाधी, प्रचंड कटकटी टळतात. तो क्षण घालवला, तसाच बेहोश राहिला, तर सगळे जीवन व्यर्थ होते ! प्रचंड कटकटी, व्याप, उपाधीत संसारात अडकतो. पिंजर्याच्या दाराशी असतो. दार उघडेच असते. आत शिरला की, अडकला. दार बंद होते. मग अडकतोच. आता त्या पिंजर्यातून सुटका होणे कठीण !’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, ऑक्टोबर २०२३)