सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी गोव्याला जातांना झालेला भीषण अपघात आणि तेव्हा आलेल्या अनुभूती
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जातांना चारचाकी गाडीला झालेला भीषण अपघात
‘मे २०२३ मध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या गोवा येथे होणार्या ब्रह्मोत्सवाला जाण्यासाठी मी कुटुंबियांसमवेत चारचाकी गाडीने प्रवास करत होतो. त्या दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडत होता. दुपारी २.४५ वाजता कोल्हापूर येथील एका पेट्रोल पंपावर इंधन भरून बाहेर येत असतांना महामार्गावरून येणार्या एका टेम्पोने आमच्या चारचाकीला जोरात धडक दिली. त्यामुळे आमच्या गाडीचे चाक फुटले आणि एका बाजूची दोन्ही दारे अन् पुढील दिवे पूर्णपणे तुटले.
२. अनुभवलेली अपार गुरुकृपा !
अ. गाडीत मी, माझी पत्नी, माझी २ मुले, पत्नीची बहीण आणि तिची मुलगी असे ६ जण होतो; मात्र इतका मोठा अपघात होऊनही आम्हा कुटुंबियांच्या केसालाही धक्का लागला नाही !
आ. पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या वाहनातून पोलीसचौकीकडे जात असतांना पोलीस मला म्हणाले, ‘‘तुमच्यावर देवाची कृपा आहे; म्हणून तुम्ही सर्व जण वाचलात.’’
इ. इतक्या मोठ्या आपत्तीमध्येही गुरुकृपेने आमची साधकांच्या घरी रहाण्याची व्यवस्था झाली आणि नंतर कुठलीही अडचण न येता गोव्यापर्यंतचा पुढील प्रवास गुरुदेवांच्या कृपेने निर्विघ्नपणे पार पडला.
३. ब्रह्मोत्सवानंतर परत आल्यावर रात्री तीव्र आध्यात्मिक त्रास होणे आणि गुरुदेवांना प्रार्थना करून ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील त्यांचे प्रवचन ऐकत झोपल्यावर त्रास दूर होणे.
ब्रह्मोत्सवानंतर पुण्याला परत आल्यावर रात्री २.३० वाजता झोपेत मला पुष्कळ त्रास होऊ लागला. ‘मला २५ – ३० जण जोरात ओढून बांधत आहेत’, असे मला जाणवले. मी घाबरून ओरडलो आणि पत्नीला उठवून याविषयी सांगितले, तरीही माझ्या मनातील भीती जात नव्हती; म्हणून रात्री मी पत्नीसह थोडा वेळ घराबाहेर चालण्यासाठी गेलो. त्यानंतर मी गुरुदेवांना प्रार्थना करून ‘सनातन चैतन्यवाणी ॲप’वरील त्यांचे प्रवचन ऐकत झोपलो. त्या दिवसानंतर मला पुन्हा अशा प्रकारचा त्रास जाणवला नाही.
४. कृतज्ञता
‘गुरुदेवांनी एवढ्या मोठ्या संकटातून वाचवून आम्हाला पुर्नजन्मच दिला आहे’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. रामचंद्र लुगडे, हडपसर, पुणे. (११.१२.२०२३)
|