अवधपुरी श्रीराम अवतरले । देवा, मी रामरूपी रंगले ।
‘अयोध्या येथील श्रीराममंदिरात २२.१.२०२४ या दिवशी श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होण्याच्या आधी २१.१.२०२४ या दिवशी श्रीरामाचे पूजन करण्याविषयी देवाने मला काव्य सुचवले. ते येथे दिले आहे..
अवधपुरी श्रीराम अवतरले ।
हृदयमंदिरी श्रीराम स्थापिले ।। १ ।।
मम अंतरी चैतन्य विस्तारले ।
चैतन्याने मन चिंब भिजले ।। २ ।।
पूजेसाठी हस्त सरसावले ।
मोहक रूप बघता नेत्र पाणावले ।। ३ ।।
भावगंध ते भाळी लाविले ।
मम अंतरंग ते सुगंधी जाहले ।। ४ ।।
कुमकुम तिलक कपाळी लाविले ।
अन् क्षात्रभावे बाहू विस्फारिले ।। ५ ।।
भक्तीपुष्प ते चरणी अर्पिले ।
रामतत्त्व देहांतरी भरूनी राहिले ।। ६ ।।
देवा, मी रामरूपी रंगले ।
जीव शिव एकची जाहले’ ।। ७ ।।
– सौ. अंजली जोशी (वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, मिरज.