चित्रपटात महिलांना ‘आयटम’ (वस्तू) म्हणून दाखवले जाते, याची मला लाज वाटते ! – अभिनेते आमीर खान
अभिनेते आमीर खान यांची क्षमायाचना !
मुंबई – हिंदी चित्रपट तेवढ्या दायित्वाने बनवले जात नाहीत. जेव्हा आपण चित्रपटात काहीतरी चुकीचे दाखवतो, तेव्हा त्याचे परिणाम चांगले झाले आहेत, असेही दाखवले जाते. हे चुकीचे आहे. आपण चित्रपटात महिलांना ‘आयटम’ बनवतो. ‘तू चीज बडी है मस्त मस्त’ अशा गाण्यांमध्येही आपण तेच करतो. या सगळ्यात माझाही कुठेतरी हातभार आहे. मीही अशा चित्रपटात काम केले आहे, असे चित्रपट बनवले आहेत. ‘खंबे जैसी खडी है, लडकी है या छडी है’ या गाण्यात आपण महिलांना माणूस म्हणत नाही. मला याची लाज वाटते, अशा शब्दांत चित्रपट अभिनेता आमीर खान यांनी क्षमा मागितली आहे.
‘अॅनिमल’ या चित्रपटात पुरुषांचे महिलांसमवेत दाखवण्यात आलेले वर्तन यामुळे किरण राव यांनी टीका केली होती. त्यांना या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डी यांनी, ‘तुमचे पूर्वाश्रमीचे पती आमीर खान यांचे चित्रपट पहावेत’, असे म्हटले होते. त्यासाठी वांगा यांनी आमीर खान यांच्या चित्रपटांचा उल्लेख केला होता. त्यावरून आमीर खान यांनी वरील शब्दांत क्षमा मागितली.
संपादकीय भूमिका
|