Jharkhand Hanuman Katha Permitted : झारखंड उच्च न्यायालयाकडून ‘हनुमान कथा’ कार्यक्रमाला अनुमती !
झारखंड मुक्ती मोर्चाने दिला होता नकार
रांची – झारखंड उच्च न्यायालयाने ‘हनुमान कथा आयोजन समिती’ला ‘हनुमान कथा’ कार्यक्रम आयोजित करण्याची अनुमती दिली आहे. राज्य सरकारच्या अधिकार्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करून या कार्यक्रमाला अनुमती नाकारली होती.
Jharkhand High Court grants permission for 'Hanuman Katha' event.
Jharkhand Mukti Morcha had denied permission.
Would the JMM Government, which showed audacity in denying permission for Hindu programs, have had the courage to deny permission for Mu$lim programs ?
सोरेन सरकार ।… pic.twitter.com/XHDk52V9rZ
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 5, 2024
१. ‘हनुमान कथा आयोजन समिती’ने ‘१० फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी या कालावधीत पलामू जिल्ह्यातील मेदिनीनगर येथे ‘हनुमान कथा’ आयोजित करण्याची अनुमती द्यावी’, अशी विनंती करणारी याचिका झारखंड उच्च न्यायालयात प्रविष्ट (दाखल) केली होती.
२. न्यायमूर्ती आनंद सेन म्हणाले की, या खटल्यात प्रतिवादींनी केवळ कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या निर्माण होण्याविषयी युक्तीवाद केला. न्यायमूर्तींनी हा युक्तीवाद फेटाळून लावला आणि ‘हनुमान कथा आयोजन समिती’ला कार्यक्रम आयोजित करण्यास अनुमती देण्याचा आदेश दिला.
३. या कार्यक्रमात बागेश्वर धामचे धर्मगुरु धीरेंद्र कृष्ण शास्त्री मुख्य वक्ते आहेत.
Jharkhand HC Grants Permission For "Hanumant Katha" Event Featuring Bageshwar Dham Sarkar, Says State Couldn't Substantiate âLaw & Order Problem" https://t.co/nCpLD9VYY8
— Live Law (@LiveLawIndia) February 5, 2024
संपादकीय भूमिकाहिंदूंच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्याची मर्दुमकी दाखवणाऱ्या झारखंड मुक्ती मोर्चा सरकारने मुसलमानांच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्याचे धाडस केले असते का ? |