Mufti Azhari Arrested : हिंदूंना ‘कुत्रा’ म्हणणारा मुफ्ती अजहरी याला अटक
|
मुंबई – इस्लामचा तथाकथित अभ्यासक मुफ्ती सलमान अजहरी याला हिंदुद्वेषी आणि आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या विरोधात अटक करण्यात आली आहे. ४ फेब्रुवारीला सकाळी साध्या पोशाखात गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाचे ४० पोलीस त्याच्या घरी गेले आणि गुजरातमध्ये त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवल्याचे सांगितले. दुपारी त्याला घाटकोपर येथील पोलीस ठाण्यात नेण्यात आले. मध्यरात्री त्याला न्यायाधिशांच्या घरी नेण्यात आले आणि ‘ट्रान्झिट रिमांड ऑर्डर’ (अटक केलेल्याला दुसर्या राज्यात जाण्यासाठी पोलीस कोठडीत पाठवण्याचा न्यायदंडाधिकार्यांचा आदेश) घेऊन त्याला गुजरातमध्ये नेण्यात आले. त्याला २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याला जुनागड (गुजरात) येथील न्यायालयात नेले जाणार आहे.
धर्मांधांमुळे पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण
अजहरी याला अटक केल्याचे समजताच ४ फेब्रुवारीला रात्री ९ नंतर या कारवाईला विरोध करण्यासाठी पोलीस ठाण्याच्या समोर प्रचंड मोठ्या संख्येने मुसलमान गोळा झाले आणि घोषणा देऊ लागले. १२ घंटे हे चालू होते. त्यामुळे तिथे बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर पोलीस आणि अजहरी यांनी मुसलमानांना शांतता राखण्याचे आणि तेथून जाण्याचे आवाहन केले. मोठ्या प्रमाणात वरिष्ठ अधिकारी आणि पोलीस या परिसरात आहेत.
अजहरी याच्या विरोधात याआधीही गुन्हे नोंद
आतापर्यंत अजहरी याच्यावर अनेकदा द्वेषयुक्त भाषण केल्याच्या प्रकरणात गुन्हे नोंद आहेत. वर्ष २०१८ मध्ये कर्नाटक येथेही हिंदूंविरोधी वादग्रस्त टिपणी केल्याचा गुन्हा त्याच्यावर अद्याप नोंद आहे. या प्रकरणी सध्या तो जामिनावर बाहेर आहे.
अजहरी याचे जगभर अनुयायी
सुन्नी इस्लामिक अभ्यासक म्हणवला जाणारा मुफ्ती सलमान अजहरी याने ‘जामिया रियाजुल जन्नाह’, ‘अल अमन शिक्षण’, ‘कल्याण संस्था’ आणि ‘दारुल अमन’ या संस्थांची स्थापना केली आहे. इजिप्तमधील अल-अजहर विश्वविद्यालयमधून त्याने शिक्षण घेतले आहे. सलमान अजहरी याचे अनुयायी जगभर पसरलेले आहेत. अजहरी याचा अधिवक्ता आरिफ सिद्दकी म्हणाले की, अजहरी यांना नोटीस देणे आवश्यक होते. नोटिसीचे पालन केले नाही, तर अटक होते. या अटकेच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागू.
(सौजन्य : Hindustan Times)
अजहरी याच्याकडून हिंदूंचा ‘कुत्रा’ म्हणून उल्लेख !अजहरी याच्या विरोधात कलम १५३ ए, ५०५, १८८, ११४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ३१ जानेवारी या दिवशी जुनागढमध्ये त्याने भाषणात, ‘आता काही वेळ शांतता आहे, नंतर आवाज होईल. आता कुत्र्यांची (हिंदूंची) वेळ आहे. उद्या आपली वेळ येईल’, असे वक्तव्य केले होते. या कार्यक्रमाच्या आयोजकांवरही तेथील पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी सांगितले, ‘अजहरी हे धर्म आणि व्यसनमुक्ती विषयी जनजागृती करतील’, असे आयोजकांनी सांगितले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला अनुमती देण्यात आली; परंतु त्याने भडकाऊ भाषण केले.’ |
पोलीस ठाण्यात जमाव जमावणार्या १६ हून अधिक जणांच्या विरोधात गुन्हा नोंद !अझहरी याला मुंबईतून अटक करण्यात आल्यानंतर अटकेला विरोध करण्यासाठी घाटकोपर पोलीस ठाण्यात जमाव जमवणार्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या साहाय्याने सलमान सय्यद, अजीज शेख, महंमद शब्बीर, बिलाल रेहमान, महंमद रजा कुरेशी यांच्यासह १६ जणांच्या विरोधात दगडफेक करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि अवैध जमाव गोळा करणे या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. १२ घंट्यांहून अधिक वेळ पोलीस ठाण्याबाहेर समर्थक जमले होते. |