८ वर्षांनी भ्रष्टाचार्‍यांवर कारवाई करणे, हाही एक गुन्हाच होय !  

‘गौहत्ती (आसाम) येथे तैनात रेल्वे मंत्रालयातील काही अधिकारी भ्रष्टाचारात आकंठ बुडाल्याची तक्रार केंद्रीय अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यावरून विभागाने ७ अधिकार्‍यांच्या घरांवर धाड घातली. यामध्ये उपमुख्य अभियंता रामपाल, माजी अभियंता जितेंद्र झा, बी.यू. लष्कर, वरिष्ठ विभाग अभियंता ऋतुराज गोगोई, धीरज भगवती, मनोज सैकिया आणि मिथुन दास या अधिकार्‍यांचा समावेश आहे. या सर्वांनी १ मे २०१६ ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत ६० कोटी रुपयांहून अधिकची लाच घेतली.’

(३१.१.२०२४)