आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र येणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
काणकोण (गोवा) – हिंदु धर्माची सध्याची स्थिती पहाता हिंदूसंघटन ही काळाची आवश्यकता आहे. त्यामुळे आपापसांतील हेवेदावे विसरून केवळ हिंदू म्हणून एकत्र आले पाहिजे, असे हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितले. बेतुल येथे श्रीकृष्ण मंदिरात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला मंदिराचे विश्वस्त आणि स्थानिक हिंदुत्वनिष्ठ नागरिक उपस्थित होते. या वेळी समितीचे दक्षिण गोवा समन्वयक श्री. सत्यविजय नाईक यांनी उपस्थितांना हलाल जिहाद, वक्फ बोर्डाद्वारे होत असलेला ‘लँड (भूमी) जिहाद’ यांविषयी माहिती दिली. या वेळी उपस्थित हिंदूंनी काळाची आवश्यकता लक्षात घेऊन धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली.