मुंबईत साडेतीन लाखांहून अधिक कुटुंबांनी सर्वेक्षणास दिला नकार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण पडताळण्यासाठीच्या सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे. २३ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत ३८ लाख ८४ हजार ८०७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यांपैकी २९ लाख ४३ सहस्र २७९ घरांनी सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला. ५ लाख ८२ सहस्र ५१५ घरे बंद होती. ३ लाख ५८ सहस्र ६२४ घरांनी सर्वेक्षणाला नकार दिला. सर्वेक्षण ऐच्छिक स्वरूपाचे असल्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण चालू करण्यापूर्वी प्रतिसादकर्त्याकडून संमती मिळवणे आवश्यक होते. अशा कुटुंबांचे समुपदेशन करण्यात आले.