सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे नामजप केल्यावर श्री. कुमार माने, मिरज यांना आलेल्या अनुभूती
१. साधना होत नसल्याने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्रासाठी नामजप करतांना सहस्रारामध्ये संवेदना जाणवणे
‘एकदा मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचा सत्संग लाभला. त्या वेळी आमच्यात पुढील संभाषण झाले.
मी : माझा त्रास आणि अडचणी पुष्कळ वाढल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणे माझी सेवा होत नाही. अडचणी वाढतच आहेत. तेव्हा मी काय करू ?
परात्पर गुरु डॉक्टर : जसे जमेल, तसे करण्याचा प्रयत्न कर.
मी : अडचणी पुष्कळ वाढल्या, तर काय करायचे ?
परात्पर गुरु डॉक्टर : तू हिंदु राष्ट्रासाठी नामजप कर. त्यामुळे तू कुठेही राहून कधीही सेवा करू शकशील आणि तुझी समष्टी सेवाही होईल.
परात्पर गुरु डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे मी हिंदु राष्ट्रासाठी नामजप करण्यास आरंभ केला. हा नामजप चालू केल्यावर माझ्या सहस्रारामध्ये संवेदना जाणवू लागल्या. त्यानंतर काही कालावधीनंतर त्या संवेदना थांबल्या.
२. दुसर्या सत्संगाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांनी आवश्यकता नसल्याने सहस्राराजवळ संवेदना जाणवत नसल्याचे सांगणे
मी : मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी नामजप करत आहे. नामजप करत असतांना पूर्वी माझ्या सहस्रारात संवेदना जाणवायच्या; पण आता तसे होत नाही. संवेदना पुन्हा जाणवण्यासाठी मी काय करायला हवे ?
परात्पर गुरु डॉक्टर (हसत हसत) : अरे, दार उघडण्यासाठी ते वाजवायला लागते. आता तू दार उघडले आहेस. मग आता पुन्हा ते वाजवत का बसला आहेस ? तुझे सहस्रार उघडले आहे. आता त्यातून तुला आवश्यकतेनुसार सात्त्विकता मिळत राहील. त्यामुळे सहस्रारात संवेदना जाणवण्याची काही आवश्यकता नाही.
‘गुरूंच्या आज्ञापालनाने थेट आज्ञाचक्राचा भेद होतो’, असे मी वाचलेले होते. मला ‘प.पू. डॉक्टरांच्या आज्ञेचे पालन केल्याने सहस्रार उघडले’, याची प्रत्यक्ष अनुभूती त्यांच्याच कृपेनेच घेता आली. त्यासाठी मी त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. कुमार बाळासाहेब माने, मिरज
|