मेरठ (उत्तरप्रदेश) येथे पाकला गोपनीय माहिती पुरवणार्या सुरक्षा अधिकार्याला अटक
रशियातील भारतीय दूतावासात होत तैनात
मेरठ (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश आतंकवादविरोधी पथकाने रशियातील भारतातील दूतावासात काम करणार्या सत्येंद्र सिवाल नावाच्या कर्मचार्याला पाकची गुप्तचर यंत्रणा आय.एस्.आय.ला गोपनीय माहिती पुरवत असल्यावरून मेरठ येथे अटक केली. तो मॉस्को येथील दूतावासात काम करत होता. तो मुळचा उत्तरप्रदेशातील हापूड येथील रहाणारा आहे. वर्ष २०२१ पासून सत्येंद्र याची ‘सर्वोत्तम सुरक्षा साहाय्यक’ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तो पाक हस्तकांच्या संपर्कात होता. त्याच्याकडून १ भ्रमणभाष संच, आधारकार्ड, पॅनकार्ड आणि इतर काही वस्तू जप्त केल्या आहेत.
वर्षभरापूर्वी सामाजिक माध्यमाद्वारे पाकच्या महिला हस्तकाच्या जाळ्यात अडकला !
सत्येंद्र सिवाल गेल्या वर्षी आय.एस्.आय.च्या एका महिला हस्तकाच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याच्या ऑनलाईन चॅटसह व्हिडिओ कॉलिंग चालू झाले. पाकच्या या जाळ्यात अडकल्याने अनेक गोपनीय माहिती त्याने या महिलेला दिली. यासाठी या महिलेने प्रथम सत्येंद्रला भेटवस्तू आणि पैसे देण्याचे आमीष दाखवले. यानंतर तिने सत्येंद्रला दूतावासात येणार्या भारतीय सैन्याशी संबंधित माहिती विचारण्यास चालू केले. सत्येंद्र तिला अनेक महत्त्वाची माहिती देत होता.
संपादकीय भूमिका
|