केरळमधील युवा संमेलनात उपस्थितांकडून ‘भारत माता की जय’ घोषणेस अल्प प्रतिसाद ! (Scant Response ‘Bharat Mata Ki Jai’)

संतापलेल्या केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांनी एका महिलेला हाकलून लावले !  

केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी

कोळीकोड (केरळ) – येथे एका युवा संमेलनात ‘भारत माता की जय’ अशी घोषणा दिल्यानंतर उपस्थितीतांनी अल्प प्रतिसाद दिल्याची घटना केंद्रीय मंत्री मिनाक्षी लेखी यांच्या संदर्भात घडली. यामुळे संतप्त झालेल्या मिनाक्षी लेखी यांनी एका महिलेला घोषणा देण्यास सांगितले; मात्र तिने नकार दिल्यावर त्यांनी या महिलेला सभागृहातून निघून जाण्यास सांगितले.

१. मिनाक्षी लेखी युवा संमेलनात संबोधित केल्यानंतर शेवटी त्यांनी ‘भारत माता की जय’ची घोषणा केली; परंतु त्यांना उपस्थितांमधून अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे त्यांनी थेट विचारले, ‘भारत तुमचे घर नाही का ? भारत केवळ माझी आई  का ? कि तुमचीही आहे ? काही अडचण आहे का ?

२. यानंतर मिनाक्षी लेखी यांनी पुन्हा ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली; मात्र तेव्हाही अल्प प्रतिसाद मिळाला. त्या वेळी एका महिलेला उद्देशून त्या म्हणाल्या, ‘पिवळ्या रंगाची साडी परिधान केलेल्या महिलेने उभे रहावे. मी तुम्हाला थेट विचारते, ‘भारत तुमची आई नाही का ?’ तुम्ही असे का वागत आहात ?

३. या प्रश्‍नानंतरही त्या महिनेले ‘भारत माता की जय’ची घोषणा देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या मिनाक्षी लेखी म्हणाल्या की, मला वाटते तुम्ही येथून निघून गेले पाहिजे. ज्यांना देशाचा अभिमान नाही, ज्यांना भारताविषयी बोलण्यास लाज वाटते, त्यांना युवा संमेलनात सहभाग घेण्याची आवश्यकता नाही.

संपादकीय भूमिका

  • केरळमधील या घटनेतून तेथील लोकांची मानसिकता लक्षात येते ! ही मानसिकता पालटण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे आवश्यक आहे अन्यथा केरळचे उद्या काश्मीर झाल्यास आश्‍चर्य वाटू नये !