श्री बालाजी आणि पंचमुखी मारुति देवस्थान ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने २१ व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन !

पनवेल – ३१ जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत श्री बालाजी आणि पंचमुखी मारुति देवस्थान ट्रस्टने २१ व्या ब्रह्मोत्सवाचे आयोजन केले आहे. ‘या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी या उत्सवामध्ये सहभागी व्हा’, असे आव्हान श्री बालाजी व पंचमुखी मारुती देवस्थान ट्रस्ट पनवेल यांच्या वतीने कार्यक्रम पत्रिकेद्वारे ट्रस्टचे अध्यक्ष श्री. अशोक गिलडा आणि सचिव श्री. जगदीश लाहोटी यांनी केले आहे. हा कार्यक्रम पनवेल जुने भाजी मार्केट येथील श्री बालाजी मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या दिवसात होमहवन, वेद पारायण, रथयात्रा यांचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाची सांगता ६ फेब्रुवारीला सकाळी ९ ते १२ या वेळेत पुष्पयाग, कुंभ प्रोक्षणम्, ध्वजा-अवरोहणम, हवन, महागोष्टी प्रसादम्, एकांत सेवा यांनी होणार आहे.