संपादकीय : …अन्यथा पाकिस्तानात जा !
अयोध्या येथील भव्य दिव्य श्रीराममंदिरात २२ जानेवारी २०२४ या दिवशी जवळजवळ ५०० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यानंतर आता मथुरा येथील कृष्ण जन्मभूमी आणि काशीविश्वनाथ मंदिराचा वाद सुटण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदारसंघातील ज्ञानवापीस्थित व्यासजींच्या तळघरात नियमित पूजा चालू करण्याचा ऐतिहासिक आदेश वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश डॉ. अजयकृष्ण विश्वेश यांनी नुकताच दिला आहे. त्यामुळे समस्त हिंदूंच्या मनातील आणखी एका इच्छेची पूर्तता झाली. यापूर्वी ज्ञानवापी परिसरातील संबंधित तळघर जिल्हा प्रशासनाने स्वतःच्या कह्यात घेण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे.
ज्ञानवापीचा इतिहास
‘ज्ञानवापी’ हे नाव संस्कृत असून त्याचा अर्थ ‘ज्ञानाचा तलाव किंवा ज्ञानकुंड’ असा होतो. काशीविश्वनाथ मंदिर औरंगजेबाने तोडून तिथे मशीद बांधली होती, हे आता मंदिराविषयी मिळालेल्या अनेक पुराव्यांतून सिद्ध होत आहे. ४ थ्या आणि ५ व्या शतकात म्हणजेच गुप्त साम्राज्याच्या काळात काशीविश्वनाथ मंदिर बांधल्याचा दावा केला जातो. इ.स. ६३५ मध्ये प्रसिद्ध चिनी प्रवासी ह्युएन त्सांग याच्या लेखनामध्ये काशीविश्वनाथ मंदिर आणि वाराणसी यांचे वर्णन आले आहे. इ.स. ११९४ ते ११९७ मध्ये महंमद घोरीच्या आदेशाने काशीविश्वनाथ मंदिराची मोठ्या प्रमाणात नासधूस करण्यात आली. यानंतर अनेक हिंदूंची मंदिरे पाडली गेली आणि मशिदी बांधल्या गेल्या. इ.स. १६६९ मध्ये मोगल सम्राट औरंगजेबाच्या आदेशाने काशीविश्वनाथ मंदिर पाडण्यात आले आणि त्याच्या जागी मशीद बांधण्यात आली. ‘हिंदूंचे मानसिक खच्चीकरण करून मंदिरे उद्ध्वस्त करणे आणि हिंदु मुली अन् स्त्रिया यांच्यावर अत्याचार करणे’, ही मोगलांची नीती होती. मोगलांनी याच मानसिकतेतून काशी, मथुरा आणि अयोध्या हे हिंदूंसाठी पवित्र श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणांची विटंबना केली. मंदिरे पाडून मशिदी उभ्या करतांना त्यांनी कधीही हिंदूंची मंदिरे पूर्णपणे उद्ध्वस्त केली नाहीत, तर हिंदूंच्या जखमांवर मीठ चोळण्यासाठी मंदिरांच्या काही भागांवरच मशिदी उभारल्या.
यानंतर पुन्हा मराठा साम्राज्याच्या काळात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी सध्याच्या काशीविश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला. वर्ष १९३६ मध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात संपूर्ण ज्ञानवापी परिसरात नमाजपठण करण्याच्या अधिकारासाठी जिल्हा न्यायालयात खटला चालवण्यात आला. १५ ऑगस्ट १९३७ या दिवशी न्यायालयाकडून ‘ज्ञानवापी संकुलात नमाजपठण कुठेही करता येणार नाही’, असेही सांगण्यात आले. तत्कालीन उच्च न्यायालयाने १० एप्रिल १९४२ या दिवशी कनिष्ठ न्यायालयाचा निकाल कायम ठेवत इतर पक्षांचे अपील फेटाळले. यानंतर पंडित सोमनाथ व्यास, डॉ. रामरंग शर्मा आणि इतर जणांनी १५ ऑक्टोबर १९९१ या दिवशी वाराणसी न्यायालयात ज्ञानवापी येथे नवीन मंदिर बांधण्यासाठी, तसेच उपासनेचे स्वातंत्र्य मिळावे यांसाठी दावा प्रविष्ट केला. ‘अंजुमन इनाजानिया मस्जिद’ आणि ‘उत्तरप्रदेश सुन्नी वक्फ बोर्ड, लखनऊ’ यांच्या वतीने या दाव्याला आव्हान देणार्या २ याचिका वर्ष १९९८ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आल्या. ७ मार्च २००० या दिवशी पंडित सोमनाथ व्यास यांचे निधन झाले. त्यामुळे ११ ऑक्टोबर २०१८ या दिवशी या प्रकरणात वादी म्हणून माजी जिल्हा सरकारी अधिवक्ता विजय शंकर रस्तोगी यांची नियुक्ती करण्यात आली होती.
मुसलमानांनी पुराव्यांना सत्य मानावे !
वाराणसी येथील काशीविश्वनाथ मंदिराचा परिसर कधीकाळी अतिशय संवेदनशील म्हणून ओळखला जात होता. या ठिकाणी असलेल्या विश्वनाथाचे मूळ मंदिर पाडून मंदिराच्या अवशेषांवरच मशीद उभारण्यात आल्याचे अनेक पुरावे ज्ञानवापी परिसरात आहेत. सामान्यपणे भगवान शिवाच्या मंदिरासमोर नंदी असतो. वाराणसी येथे मात्र नंदी एकीकडे आणि शिवमंदिर दुसरीकडे अशी स्थिती आहे. या ठिकाणी असलेल्या नंदीचे तोंड मशिदीकडे आहे. याचाच अर्थ सध्या ज्या ठिकाणी मशीद आहे, तेथे कधीकाळी काशीविश्वनाथाचे मंदिर होते, हे सिद्ध होते. भारतीय पुरातत्व विभागाने ‘ज्ञानवापी मशीद’ म्हणून ओळखल्या जाणार्या भागाचे सर्वेक्षण केल्यानंतर ‘त्या ठिकाणी आधी प्राचीन असे ‘हिंदु मंदिर’ असल्याचे अहवालात म्हटले आहे. याविषयी त्यांनी अनेक पुरावे दिले आहेत.
धर्मांधांचा कट्टरपणा कधीपर्यंत ?
अयोध्येत श्रीराममंदिर उभारले जाणे आणि ज्ञानवापीविषयी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर धर्मांधांना पोटशूळ उठला आहे. सामाजिक माध्यमांत काही धर्मांधांनी अल्पवयीन मुसलमान मुलांना हाताशी धरून श्रीराममंदिर तोडण्याची भाषा केली. काही गावात धर्मांधांनी हिंदूंच्या फेरीवर दगडफेक केली आहे. औरंगजेब, टिपू सुलतान यांचे स्टेटस् ठेवणे, दंगली घडवणे, विनाकारण हिंदूंना मारहाण करणे, हिंदूंच्या मालमत्तेची हानी करणे, तसेच मुसलमान राज्यकर्त्यांनी हिंदूंच्या धार्मिक स्थळांच्या केलेल्या विटंबनेचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे समर्थन करणे, हा धर्मांधाचा दुटप्पीपणा आता फार काळ खपवून घेतला जाणार नाही, हे आता शासनाने सांगायला हवे. खरेतर आतापर्यंतच्या काँग्रेसच्या शासनकर्त्यांनी स्वतःचा राजकीय लाभ आणि स्वार्थ यांसाठी हिंदु समाजावर अन्याय करत मुसलमानांचे लांगूलचालन केले आहे. याचा प्रारंभ मोहनदास गांधी यांनी केला. त्याचेच दुष्परिणाम आज संपूर्ण देश आणि हिंदु समाज भोगत आहे. हिंदु आपल्या मंदिरावर मशीद कसे बांधतील ? हिंदूंनी एखादी मशीद पाडून तेथे मंदिर बांधल्याचे देशात नव्हे, तर जगात एकही उदाहरण नाही; मात्र मुसलमानांनी मंदिर पाडून मशीद बांधल्याची सहस्रो उदाहरणे भारतात आहेत. ‘मुसलमान राज्यकर्त्यांच्या इतिहासाचा कोळसा कितीही उगाळला, तरी तो काळाच रहाणार आणि त्यातून त्यांचेच तोंड काळे होणार’, याची जाणीव मुसलमानांनी ठेवली पाहिजे. हे लक्षात घेऊन धर्मांधांनी कट्टरपणे न वागता काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकारावे आणि ज्ञानवापीसह त्यांनी कह्यात घेतलेली मंदिरे हिंदूंना परत द्यावीत अन् स्वतःच्या समाजाच्या विकासाकडे लक्ष द्यावे, अन्यथा भारत सोडून पाकिस्तानात जावे ! आज जागा झालेला हिंदु परकीय आक्रमकांनी तोडलेली मंदिरे पुन्हा कह्यात घेतल्याविना शांत बसणार नाही, हेही तितकेच नक्की !
मुसलमानांनी कट्टरपणे वागण्याऐवजी काशीविश्वनाथ मंदिराविषयीचे सत्य स्वीकाराणे हेच शहाणपणाचे ! |