मोगल आणि ब्रिटीश यांची अनुमती नसणारा उरूस आज ताजमहालमध्ये का होत आहे ? (Taj Mahal Urus Questioned)
अखिल भारतीय हिंदु महासभेने उपस्थित केला प्रश्न !
आगरा (उत्तरप्रदेश) – प्रतिवर्षी ६ ते ८ फेब्रुवारी या कालावधीत येथील ताजमहालमध्ये होणार्या उरूसाला (उरूस म्हणजे मुसलमानांचा उत्सव) ऐतिहासिक महत्त्व नाही. मोगल आणि ब्रिटीश यांच्या काळात या प्रकाराला अनुमती नव्हती, हे माहिती अधिकाराच्या माध्यमातून समोर आले असतांना सध्या त्याचे आयोजन का केले जात आहे ?, असा महत्त्वपूर्ण प्रश्न अखिल भारतीय हिंदु महासभेने उपस्थित करून उरूसावर कायमस्वरूपी बंदी आणली पाहिजे, अशी मागणी केली आहे.
Why is the Urus procession which was not allowed under the Mughal and British rule, being taken out at the Tajmahal ?, asks Akhil Bharatiya Hindu Mahasabha
➡️ The Mahasabha also filed a petition in this regard in the court of Agra!
ताजमहल l हिंदू महासभाpic.twitter.com/eQyoeaUKg7
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 3, 2024
आगरा येथील एका न्यायालयात यासंदर्भात महासभेने याचिकाही प्रविष्ट (दाखल) केली असून न्यायालय ४ मार्च या दिवशी यावर सुनावणी करणार आहे.
महासभेने ऊरूसच्या निमित्ताने ताजमहालमध्ये विनामूल्य प्रवेश करण्यावरूनही याचिकेत आक्षेप घेतला आहे. मोगल आक्रमणकारी शाहजहान याच्या स्मरणार्थ ६ ते ८ फेब्रुवारी या काळात हे आयोजन करण्यात येते. महासभेच्या मीना दिवाकर आणि सौरभ शर्मा यांनी अधिवक्ता अनिल कुमार यांच्या माध्यमातून दिवाणी न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश यांच्या न्यायालयात ही याचिका प्रविष्ट केली आहे.