आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी व्यायाम जोपासा ! – भाई विलणकर, ज्येष्ठ क्रीडापटू

रत्नागिरी – सीए होणे ही कठीण गोष्ट आहे. प्रचंड अभ्यास करायला लागतो. या अभ्यासातून शरीरयष्टी चांगली रहाण्यासाठी तुम्ही खेळ जोपासला आहे, ही खरी कौतुकास्पद गोष्ट आहे. खेळ हा आयुष्यात चैतन्य देणारा आहे. आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी खेळ, व्यायाम जोपासा. किमान एक तास यासाठी आवर्जून द्या. जसे अन्न पाणी आवश्यक, तसा व्यायाम आवश्यक आहे, असे वक्तव्य ज्येष्ठ क्रीडापटू भाई विलणकर यांनी केले.

करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी आणि सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेच्या वतीने सीए, करसल्लागार आणि कर्मचारी यांच्यासाठी क्रीडा महोत्सवाला २ फेब्रुवारीला प्रारंभ झाला. या वेळी ते बोलत होते.

गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या जवाहर मैदानात चालू झालेल्या या क्रीडा महोत्सवात क्रिकेट, बुद्धीबळ, कॅरम, रस्सीखेच, बॅडमिंटन आदी विविध स्पर्धा होणार असून ४ फेब्रुवारीला वितरण करण्यात येणार आहे.