युरोपियनांचे जडवादी सिद्धांत आणि प्राचीन हिंदु संस्कृतीचे धर्मसिद्धांत !
प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी यांचे मौलिक विचारधन !
१. युरोपियनांनी प्राचीन हिंदु समाजाचा भूतकाळ ‘अंधाराचे युग’ मानून मोडीत काढणे
‘गेली काही शतके जडवादी सिद्धांतांनी धर्मसिद्धांतांना नाकारले. या धारणांचा प्रभाव होता आणि अजूनही आहे. युरोपियनांनी ‘सत्ये’ नाकारली, जी त्यांना ठाऊकच नव्हती. त्यांनी ते लोक, ते भूप्रदेश, त्या समाजव्यवस्था, त्या देवीदेवता नाकारल्या, जेथे त्यांचे नियंत्रण नव्हते. त्यांनी हिंदु समाजाचा संपूर्ण भूतकाळ ‘अंधाराचे युग’ म्हणून मोडीत काढला.
२. युरोपियनांनी हिंदूंची तेजोमय समाजरचना रानटी ठरवणे आणि जडवादी सिद्धांतांना वाईट दिवस येणे
आधुनिक समाजशास्त्र आणि मानववंशशास्त्र यांची जी ‘फॅशन’ आहे, त्यानुसार लक्षावधी वर्षांची हिंदूंची तेजोमय समाजरचना रानटी (primitive) ठरवली. आमचा तेजस्वी वारसा काळाकुट्ट केला. या सिद्धांतांना आता वाईट दिवस आले आहेत.
३. हिंदु संस्कृतीचा आवाका मोठा असल्याची जगातील श्रेष्ठ चिंतकांना जाणीव होणे
जगातील श्रेष्ठ चिंतक ही दृष्टी (जडवादी सिद्धांत) पूर्णत: नाकारतात. कृतयुगापासूनचा भावी इतिहासाचा हिंदु संस्कृतीचा असलेला आवाका पुनर्चिंतनाच्या प्रक्रियेला मोठे योगदान देईल, हे त्यांना जाणवले आहे.’
– प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, सप्टेंबर २०१९)