स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम्’चे यंत्र कापून ५ ते ६ लाखांची चोरी !
धुळे येथील घटना !
धुळे – येथील शिंदखेडा भागातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ‘एटीएम्’चे यंत्र कापून ५ ते ६ लाख रुपये चोरण्यात आले. या प्रकरणी पोलिसांकडून चोरांचा शोध घेतला जात आहे.
संपादकीय भूमिका :‘एटीएम्’चे यंत्र कापले जाते, यावरून जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था अस्तित्वात आहे कि नाही, असा प्रश्न निर्माण होतो ! |