श्री संप्रदायाच्या खारघर कार्यक्रमातील दुर्घटनेप्रकरणी असीम सरोदे यांचे आरोप
नवी मुंबई – १६ एप्रिल २०२३ या दिवशी श्री संप्रदायाचे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान सोहळा खारघर (नवी मुंबई) येथे पार पडला होता. या सोहळ्यात उष्माघात आणि चेंगराचेंगरी यामुळे १४ व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या होत्या, तर अनेक जण घायाळ झाले होते. या प्रकरणी अधिवक्ता असीम सरोदे यांनी राजकीय हेतूसाठी नियोजनशून्य कार्यक्रम करून शासकीय निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे आणि पनवेल न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी सरकारी अधिकारी आरोपी असल्याने त्यांच्या विरोधात खटला चालवण्यासाठी सरकारची अनुमती न मिळाल्याने तसाच खटला चालवावा, असे त्यांनी म्हटले आहे.