Jagadguru Rambhadracharya : जगद्गुरु रामभद्राचार्य आगरा येथील रुग्णालयात भरती
प्रकृतीत अचानक बिघाड
आगरा (उत्तरप्रदेश) – जगद्गुरु रामभद्राचार्य यांची प्रकृती २ फेब्रुवारी या दिवशी अचानक बिघडली. त्यांना उपचारासाठी आगरा येथील पुष्पांजली रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
हाथरसच्या लाडपूर गावात जगद्गुरु रामभद्राचार्य यांची श्रीरामकथा चालू होती. २५ जानेवारीपासून चालू झालेल्या रामकथेचा २ फेब्रुवारी हा शेवटचा दिवस होता. याच कालावधीत फुफ्फुसाच्या संसर्गामुळे त्यांची प्रकृती खालावली. जगद्गुरु रामभद्राचार्य यांना नंतर उपचारासाठी आगरा येथे आणण्यात आले.