(म्हणे) ‘आज कुत्र्यांचा (हिंदूंचा) काळ आहे, उद्या आमचा येईल !’ – जुनागड (गुजरात) येथील मुफ्ती सलमान (MuftiSalman On Gyanvapi Pooja)
जुनागड (गुजरात) येथील मुफ्ती सलमान याचे हिदूंनी ज्ञानवापीत पूजा चालू केल्यावरून गरळओक !
जुनागड (गुजरात) – वाराणसीतील ज्ञानवापीमध्ये हिंदूंकडून उपासना चालू झाल्यावरून धर्मांध मुसलमान नेत्यांचे पित्त खवळले आहे. येथील मुफ्ती सलमान अझहरी याने एका कार्यक्रमात हिंदूंच्या विरोधात गरळओक केली आहे. मोठ्या प्रमाणात प्रसारित झालेल्या एका व्हिडिओमध्ये अझहरी म्हणतो, ‘काही वेळ शांतता आहे, मग धार येईल. आज कुत्र्यांची (हिंदूंची) वेळ आहे, उद्या आमची पाळी येईल.’ या वक्तव्याचा २२ सेकंदांचा व्हिडिओ सर्वत्र प्रसारित होत असून त्याचे मूळ भाषण ५३ मिनिटांचे आहे. मुफ्तीने एका कार्यक्रमात ३१ जानेवारी या दिवशी हे वक्तव्य केले आहे.
Mufti Salman fron #Junagadh (Gujarat) spews venom over starting of Puja at #Gyanvapi !
(Says) 'Today's time is of dogs (Hindus), Tomorrow it will be ours !'
Muftis who make such provocative statements should be frowned upon. Only strict actions can stop such Fanatical Mu$l!m… pic.twitter.com/I1VFrX5DRg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 2, 2024
मुफ्ती अझहरी पुढे म्हणतो की,
१. मशिदीत मूर्ती ठेवल्याने मशीद मूर्तीगृह बनत नाही. तुम्ही काबा येथे ३६० मूर्ती ठेवल्या, तरीही काबा काबाच राहिला. हज कधीच थांबला नाही. (या वक्तव्यातून काबामध्ये हिंदूंच्या देवतांच्या ३६० मूर्ती आहेत, असे मुफ्ती यांनी स्वीकारल्याचे समजायचे का ? यावर ओवैसी यांसारख्या मुसलमान नेत्यांना काय म्हणायचे आहे ? – संपादक)
२. पॅलेस्टाईन, इराण, बर्मा (म्यानमार) येथे सर्वत्र मुसलमानांची हत्या होत आहे; पण त्यांच्या मृत्यूने इस्लाम संपणार नाही.
३. मुसलमानांना स्वतःलाच जागृत करावे लागेल. त्यांच्यासाठी कोणताही नेता किंवा विरोधी पक्ष येणार नाही. क्रांती मुसलमानांच्या घरातून होईल.
४. मशिदींचे मूर्तीगृहात रूपांतर करण्याचे धाडस त्यांच्यात (हिंदूंमध्ये) नाही. तुम्ही मशिदी ओसाड सोडल्या आहेत. जेव्हा मैदान उघडे असते, तेव्हा कुत्रे राज्य करतात. तुम्ही शेतात फिरत राहिला, तर कुत्रे रहाणार नाहीत.
५. मुसलमानांनो, घाबरू नका, देवाची महिमा अजून शिल्लक आहे. इस्लाम अजून जिवंत आहे, कुराण शेष आहे.
जुनागड पोलिसांनी घेतली नोंद !
या प्रकरणाची पोलिसांनी नोंद घेतली असून जुनागडचे पोलीस उपायुक्त हितेश धंडालिया म्हणाले की, आम्ही संपूर्ण भाषण मिळवले आहे आणि ते कायदेशीर तज्ञांच्या मतासाठी पाठवले आहे. आक्रमकता दाखवणार्यावर कारवाई केली जाईल.
संपादकीय भूमिका
|