Uttarakhand UCC : उत्तराखंड सरकारकडून समान नागरी कायद्याचे प्रारूप सादर !
आज मंत्रीमंडळाच्या बैठकीत होणार चर्चा
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंड सरकारने समान नागरी कायद्यासाठी स्थापन केलेल्या तज्ञांच्या समितीने कायद्याचे अंतिम प्रारूप सरकारला सादर केले. समितीच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई यांनी येथे एका कार्यक्रमात अंतिम प्रारूप मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना सादर केले. याविषयी मुख्यमंत्री धामी म्हणाले की, आम्ही बर्याच दिवसांपासून प्रारूपाची वाट पहात होतो. आता समितीचा अहवाल आल्यानंतर आम्ही पुढे जाऊ. सर्व औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आम्ही ते विधानसभेत मांडू.
#WATCH उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने कहा, “लंबे समय से हमें इस ड्राफ्ट का इंतजार था, आज हमें ड्राफ्ट मिल गया है। हमने उत्तराखंड की जनता से वादा किया था कि नई सरकार के गठन के बाद हम समान नागरिक संहिता के लिए कानून बनाएंगे। इस ड्राफ्ट का परीक्षण करने के बाद जो भी… https://t.co/da7N5VJzAV pic.twitter.com/vnLVihpzO5
— ANI_HindiNews (@AHindinews) February 2, 2024
५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशन !
उद्या, ३ फेब्रुवारीला मंत्रीमंडळाच्या बैठकीत हे प्रारूप सादर केले जाणार आहे. मंत्रीमंडळाने संमती दिल्यानंतर तो विधानसभेत मांडला जाईल. यासाठी ५ फेब्रुवारीपासून सभागृहाचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे.