नाशिक येथील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा !
पोलादपूर (रायगड) – नाशिक येथील २८ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांना पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. नाशिकमधील भोसला मिलिटरी शाळेची ३ दिवसीय सहल रायगडमध्ये गड-दुर्ग पहाण्यासाठी आली होती. यात १०३ विद्यार्थी होते. बाहेरील खाद्यपदार्थ, तसेच शीतपेयाचे सेवन यांमुळे मुलांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सद्य:स्थितीत सर्वांची प्रकृती स्थिर आहे.