BLA Operation Dara-e-Bolan : बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) माच आणि बोलान शहरे घेतली कह्यात !
|
क्वेटा – वर्ष १९७१ प्रमाणेच पाकिस्तानचे २ तुकडे होऊन वेगळा देश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या पश्चिमेकडील बलुचिस्तान प्रांतात स्वातंत्र्यासाठी लढणार्या ‘बलूच लिबरेशन आर्मी’ ने (बी.एल्.ए.ने) सैन्यदलाच्या स्थानांवर आक्रमण केले असून माच आणि बोलान शहरे कह्यात घेतल्याचा दावा केला आहे. ‘माच शहरातील आक्रमणात ४५ पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत, तर पीर गाबमध्ये १० लोक मारले गेले आहेत’, असा दावा बी.एल्.ए.ने केला आहे.
‘Operation Dara-e-Bolan’: BLA Claims Over 40 Hours of Control in Mach Amidst Ongoing Clashes with Pakistani Forces https://t.co/4Tab5k60Qp
— The Balochistan Post – English (@TBPEnglish) January 31, 2024
१. ‘द बलुचिस्तान पोस्ट’च्या वृत्तात म्हटले आहे की, बी.एल्.ए.ने ‘माच शहर आणि त्याच्या आजूबाजूचा भाग कह्यात घेतला आहे. ‘बी.एल्.ए.’ने प्रवक्ते जियांद बलोच म्हणाले की, ‘बी.एल्.ए.’च्या सैनिकांनी पाकिस्तानी सैन्याला रोखण्यासाठी भूसुरुंगांचा वापर केला आणि माच शहर कह्यात घेतले.
(सौजन्य : StudyIQ IAS)
२. ‘बी.एल्.ए.’च्या सैनिकांनी पाक सैन्यदलाच्या स्थानांवर अनेक क्षेपणास्त्रे डागली. या वेळी झालेल्या चकमकीत ४ बलुच कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे. हे चौघेही ‘बी.एल्.ए.’च्या मजीद ब्रिगेडचे आत्मघाती आक्रमणकर्ते होते.
Pakistan once again heading towards the prospect of partition !
Baloch Liberation Army (BLA) takes over Mach and Balon cities !
45 #Pakistani soldiers killed#Balochistan
Operation Dara-e-Bolanpic.twitter.com/1RK7e8N58p— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) February 1, 2024
३. वर्ष १९७१ मध्ये मुक्ती संघर्ष वाहिनीने पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यदलावर अशीच आक्रमणे केली होती. त्यात भारताने मुक्ती संघर्ष वाहिनीला पाठिंबा दिला, त्यानंतर पाकिस्तानचे दोन तुकडे झाले आणि बांगलादेश हा नवा देश बनला.