१५ दिवसांच्या आत आईचे घर रिकामे करा !

वयोवृद्ध आईला बेघर केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुलासह सुनेला आदेश

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – संयुक्त कुटुंबपद्धत लोप पावत असल्याने कुटुंबातील सदस्यांकडून ज्येष्ठांची पुरेशी काळजी घेतली जात नाही. त्यामुळे अनेक वयोवृद्धांचे हाल होतात. आयुष्याच्या शेवटच्या दिवसांत त्यांच्या नशिबी एकाकी जगणे येत आहे. विशेषत: विधवांचे अधिक हाल होत आहेत, असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या निकालात नोंदवत वयोवृद्ध आईला बेघर करणारा मुलगा आणि सून यांना ‘१५ दिवसांच्या आत आईचे घर रिकामे करा’, असा आदेश न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. फिरदोश पुनीवाला यांच्या खंडपिठाने दिला आहे.

दिनेश चंदनशिवे यांनी त्यांची आई लक्ष्मी चंदनशिवे यांच्या विरोधात याचिका केली होती. पतीचे निधन झाल्यावर मुलगा दिनेश आणि त्याची पत्नी मुलुंडमधील घरी भेटायला आले; पण नंतर ते घरातून गेलेच नाहीत. उलट माझीच छळवणूक करून त्यांनी मला घर सोडण्यास भाग पाडले’, अशी तक्रार लक्ष्मी यांनी केली होती. त्यानंतर वरील निर्णय देण्यात आला.

संपादकीय भूमिका :

नातेसंबंधांमधील ओलावा आणि ज्येष्ठ नागरिकांप्रती असणारी आपुलकी नष्ट होत असल्यानेच अशा घटना घडतात ! यातून धर्मसंस्काराचे महत्त्व लक्षात येते !