Jharkhand Politics : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे त्यागपत्र !

चंपई सोरेन होणार नवे मुख्यमंत्री 

डावीकडून झारखंडचे मावळते मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि नवे मुख्यमंत्री चंपई सोरेन

रांची (झारखंड) – झारखंडचे ‘झारखंड मुक्ती मोर्चा’ सरकारचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ३१ जानेवारीला रात्री साडेआठ नंतर मुख्यमंत्री पदाचे त्यागपत्र दिले. तत्पूर्वी भूमी घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने त्यांची जवळपास ९ घंटे चौकशी केली होती. चौकशी पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री सोरेन त्यांच्या आमदारांसमवेत राजभवनावर गेले आणि राज्यपालांना भेटून मुख्यमंत्री पदाचे त्यागपत्र सादर केले. राज्यपालांनी त्यांचे त्यागपत्र स्वीकारले.

त्यांच्या त्यागपत्रानंतर पक्षाचे वरिष्ठ नेते आणि चंपई सोरेन हे मुख्यमंत्री होणार आहेत. ते हेमंत सोरेन यांचे नातेवाईक नाहीत. हेमंत सोरेन यांना भूमी घोटाळ्यावरून अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक होण्याची शक्यता असल्यानेच त्यांनी त्यागपत्र दिल्याचे सांगितले जात आहे.