Union Budget 2024 : निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारी या दिवशी सादर करणार अर्थसंकल्प !
नवी देहली – अर्थमंत्री निर्मला सीतारामन् १ फेब्रुवारी या दिवशी वर्ष २०२४ चा अर्थसंकल्प (बजेट) सादर करतील. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वीचा आणि या सरकारच्या दुसर्या कार्यकाळातील हा शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सौजन्य : इंडिया टूडे
‘यंदाचा अर्थसंकल्प ‘अंतरिम’ असल्यामुळे सरकार कोणत्याही मोठ्या घोषणा करण्याचे टाळेल’, असे तज्ञांचे मत आहे. यावर्षी एप्रिल-मे महिन्यांत लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्याआधी सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा अंतरिम असतो. निवडणुकीनंतर सत्ताधारी पक्ष जो अर्थसंकल्प सादर करणार, तो अर्थसंकल्प अंतिम असणार आहे.