मुसलमान भाविकांनी अयोध्येत घेतले श्री रामललाचे दर्शन !
अयोध्या – प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर येथे भव्य आणि दिव्य श्रीराममंदिर बांधले गेले असून श्री रामलाला गर्भगृहात विराजमान झाले आहेत. श्री रामललाचे दर्शन घेण्यासाठी तेथे मुसलमान भाविकही पोचले आहेत. लक्ष्मणपुरी येथील मुसलमान भाविकांचा एक गट अयोध्येत पोचला आणि त्याने नुकतेच श्री रामललाचे दर्शन घेतले. लखनौ हे शहर ‘लक्ष्मणपुरी’ या नावाने ओळखले जावे आणि मंदिरात लक्ष्मणाची मूर्तीही बसवण्यात यावी, असा आशीर्वाद या भाविकांनी देवाकडे मागितला आहे.
सौजन्य न्यूज 18 युपी उत्तराखंड
१. शेकडो मुसलमान भाविक २५ जानेवारीला लक्ष्मणपुरीहून निघून ३० जानेवारीला श्री रामललाचे आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येत पोचले. मुसलमान भाविक दिवसाला २५ किलोमीटर प्रवास करत होते.
२. मुसलमान समाजातील हे लोक भगवान श्रीरामाला त्यांचा पूर्वज मानतात. ते म्हणाले की, प्रभु श्रीरामाचे संपूर्ण जीवन न्याय आणि तपश्चर्या यांवर आधारित आहे. श्रीराम हिंदु आणि मुसलमान सर्वांसाठी आहेत. श्रीराम पूर्वीही होता आणि आजही आहे.